नवी दिल्ली - दिल्लीसह एनसीआरमध्ये दूध पुरवठा करण्यात आघाडीवर असलेल्या मदर डेअरीने कोरोनाच्या संकटकाळात नवीन उत्पादन बाजारात आणले आहे. मदर डेअरीने हळदयुक्त दूध ग्राहकांना उपलब्ध करून दिले आहे.
प्रत्येक दुधाच्या बाटलीमध्ये एक चमचा हळदीची पावडर असल्याचे मदर डेअरीने म्हटले आहे. आयुष मंत्रालयाने आरोग्यविषयक दिलेल्या सूचनांचे पालन करून हे दूध बाजारात आणल्याचे कंपनीने म्हटले आहे. यामागे ग्राहकांची प्रतिकार क्षमता वाढविण्याचे उद्दिष्ट असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
करक्युमिन आणि फ्लावोनूड घटक असतात. याचा उपयोग प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी होतो.
व्यवस्थापकीय संचालक संग्राम चौधरी म्हणाले, की हळदीच्या चांगल्या गुणांची माहिती भारताच्या आयुर्वेदिक विज्ञानात हजारो वर्षापासून सांगण्यात आली आहे. हळदीच्या या गुणांचा उपयोग दैनंदिन जीवनात संसर्गापासून बचाव करण्यासाठी होतो. हळदयुक्त एका दुधाच्या बॉटलची किंमत 25 रुपये आहे.
यापूर्वी अमुलनेही हळदीचे दूध बाजारात आणले होते.