ETV Bharat / business

विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय नाही; एअर इंडियाने बुकिंग सुरू केल्यानंतर सरकारचे स्पष्टीकरण - Civil aviation

केंद्र सरकारने निर्णय घेतल्यानंतरच विमान कंपन्यांनी तिकिट बुकिंग सेवा सुरू करावी, असा सल्ला नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने घेतला आहे.

एअर इंडिया
एअर इंडिया
author img

By

Published : Apr 19, 2020, 10:48 AM IST

नवी दिल्ली - एअर इंडियाने देश व आंतरराष्ट्रीय विमान प्रवासांसाठी तिकिट बुकिंग केल्याच्या दुसऱ्याच दिवशी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने मोठा खुलासा केला आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने देश व विदेशात विमान उड्डाण सुरू करण्यार निर्णय घेतला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

केंद्र सरकारने निर्णय घेतल्यानंतरच विमान कंपन्यांनी तिकिट बुकिंग सेवा सुरू करावी, असा सल्ला नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने घेतला आहे.

  • The Ministry of Civil Aviation clarifies that so far no decision has been taken to open domestic or international operations.

    Airlines are advised to open their bookings only after a decision in this regard has been taken by the Government.@MoCA_GoI @DGCAIndia @AAI_Official

    — Hardeep Singh Puri (@HardeepSPuri) April 18, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

एअर इंडियाच्या वेबसाईटवरील मजकूर
एअर इंडियाकडून तिकिट बुकिंग सेवा सुरू

एअर इंडियाच्या वेबसाईटवर तिकिट बुकिंग सेवा सुरू-

टाळेबंदी संपल्यांनंतर एअर इंडियाची बुकिंग सेवा ४ मेपासून सुरू होणार आहे. तर आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांची बुकिंग सेवा १ जूनपासून सुरू होणार आहे. देशात २५ मार्च ते १४ एप्रिलदरम्यान टाळेबंदी करण्यात आली आहे. तर दुसऱ्या टप्प्यात १५ एप्रिल ते ३ मेपर्यंत टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. या कालावधीत देश-विदेशातील विमान उड्डाणे केंद्र सरकारने स्थगित केली आहेत.

संबंधित बातमी वाचा- एअर इंडियाची देश-विदेशातील निवडक मार्गांवर 'या' तारखेपासून सुरू होणार सेवा

दरम्यान, टाळेबंदीमुळे अनेक भारतीय विदेशात व विविध शहरांमध्ये अडकून पडले आहेत. त्यांच्याकडून विमान सेवा सुरू करण्याची मागणी होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.