ETV Bharat / business

शेअर बाजार गुंतवणुकदारांच्या संपत्तीत 3 दिवसांत 5.76 लाख कोटींची वाढ

author img

By

Published : Aug 30, 2021, 9:07 PM IST

गेल्या तीन दिवसांमध्ये मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 945.55 अंशाने वधारला. बाजाराचा निर्देशांक वाढल्याने शेअर बाजारातील सूचीबद्ध कंपन्यांचे भांडवली मूल्य हे वाढून 2,47,30,108.97 कोटी रुपये झाले आहे.

नवी दिल्ली - मुंबई शेअर बाजाराने विक्रमी निर्देशांक नोंदविल्याने बाजारातील सूचीबद्ध कंपन्यांची संपत्ती 247.30 कोटी रुपयांनी वाढली आहे. तर गेल्या तीन दिवसांमध्ये गुंतवणुकदारांच्या संपत्तीत 5.76 लाख कोटींची वाढ झाली आहे.

मुंबई शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी निर्देशांक वधारला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सोमवारी 765.04 अंशाने वधारून 56,889.76 वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक 833.55 अंशाने वधारून 56,958.27 वर स्थिरावला. मुंबई शेअर बाजार आणि निफ्टीने आज विक्रमी निर्देशांक नोंदविला.

हेही वाचा- महाराष्ट्राच्या राज्यपालांमुळे उत्तराखंडमध्ये तापले राजकारण, जाणून घ्या नेमके कारण

गेल्या तीन दिवसांमध्ये मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 945.55 अंशाने वधारला. बाजाराचा निर्देशांक वाढल्याने शेअर बाजारातील सूचीबद्ध कंपन्यांचे भांडवली मूल्य हे वाढून 2,47,30,108.97 कोटी रुपये झाले आहे. तर गुंतवणूकदारांची संपत्ती 5,76,600.66 कोटी रुपयांनी वाढली आहे.

हेही वाचा- कोविडचे नवे रूप आले समोर, लसीच्या संरक्षणालाही आव्हान देणार?; तज्ञांनी व्यक्त केला अंदाज

मुंबई शेअर बाजारात तेजी-

मुंबई शेअर बाजाराने आजवरचा विक्रमी निर्देशांक नोंदविला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर 765.04 अंशाने वधारून 56,889.76 वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक 225.85 अंशाने वधारून 16,931.05 स्थिरावला. मुंबई शेअर बाजारात सर्वाधिक एअरटेलचे 4 टक्क्यांनी शेअर वधारले आहेत. त्याचबरोबर अॅक्सिस बँक, टाटा स्टील, टायटन, मारुती आणि बजाज फायनान्सचे शेअर सर्वाधिक वधारले आहेत. दुसरीकडे टेक महिंद्रा, नेस्ले इंडिया, इन्फोसिस आणि टीसीएसचे शेअर घसरले आहेत. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांकाने दिवसाखेर पहिल्यांदाच 56 हजारांचा टप्पा ओलांडला.

हेही वाचा- सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; 'हे' आहेत आजचे दर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.