ETV Bharat / business

मारुती ऑल्टोने 20 वर्षे पूर्ण केली, आतापर्यंत 40 लाख कारची विक्री - मारुती अल्टो 20 वर्षे पूर्ण

अत्यंत स्पर्धात्मक कार मार्केटमध्ये सलग 16 वर्षे ऑल्टो सर्वाधिक विक्री होणारी कार असल्याचे मारुतीने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे. ही कार सीएनजीवर प्रति किलोग्रॅम सरासरी 31 किलोमीटर आणि पेट्रोलवर 22 किलोमीटर प्रतिलिटर अ‌ॅव्हरेज देते.

मारुती अल्टो लेटेस्ट न्यूज
मारुती अल्टो लेटेस्ट न्यूज
author img

By

Published : Oct 14, 2020, 11:54 AM IST

नवी दिल्ली - ऑल्टो या मारुती सुझुकीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या हॅचबॅक कारने 20 वर्षे पूर्ण केली असून इतक्या वर्षांत मारुतीने एकूण 40 लाख ऑल्टो विकल्या आहेत. ही कार सन 2000 मध्ये लाँच केली गेली होती. यावर्षी ऑगस्टमध्ये मारुतीने 40 दशलक्ष ऑल्टोची विक्री पूर्ण करण्याचा टप्पा गाठला.

अत्यंत स्पर्धात्मक कार मार्केटमध्ये सलग 16 वर्षे ऑल्टो सर्वाधिक विक्री होणारी कार असल्याचे मारुतीने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे. मागील दोन दशकांत या हॅचबॅक कारमध्ये अनेक बदल झाले आहेत. सध्या, अल्टो ही भारतातील पहिली बीएस 6 कम्पलाएंट एंट्री लेव्हल कार आहे.

आर्थिक वर्ष 2019 मध्ये मारुतीने छोट्या शहरांमध्ये सर्वाधिक अल्टो विकल्या. एकूण विक्रीपैकी 59% विक्री छोट्या शहरांमधून होती, जी या वर्षी वाढून 62% झाली आहे.

ही कार सीएनजीवर प्रति किलोग्रॅम सरासरी 31 किलोमीटर आणि पेट्रोलवर 22 किलोमीटर प्रतिलिटर अ‌ॅव्हरेज देते.

हेही वाचा - 2020 मध्ये जागतिक संगणक बाजारात 8.13 कोटी Q3 युनिट्सची विक्रीः आयडीसी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.