नवी दिल्ली - तुम्ही प्राप्तिकराचे विवरणपत्र भरत असाल तर ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. पॅन कार्ड हे ३१ डिसेंबरपर्यंत आधार कार्डला जोडणे बंधनकारक असणार आहे.
प्राप्तिकर विभागाने आधार-पॅन जोडणी करण्याची सूचना केली आहे. भविष्य अधिक चांगले घडवित आहोत! प्राप्तिकर विभागाच्या सेवेचे फायदे घेण्यासाठी ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत पॅन-आधार जोडणी महत्त्वाचे असल्याचे प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे. यापूर्वी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) पॅन हे आधार कार्डला जोडण्याची (लिंक) चालू वर्षात ३० सप्टेंबरची मुदत दिली होती. त्यानंतर ही मुदत वाढवून ३१ डिसेंबर करण्यात आली.
हेही वाचा-अमूलचे दूध प्रति लिटर २ रुपयांनी महाग; महाराष्ट्रासह चार राज्यांत दरवाढ लागू
गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने प्राप्तिकर परतावा भरण्यासाठी आधार कार्ड हे पॅन कार्डला जोडणे संवैधानिक असल्याचा निकाल दिला होता. प्राप्तिकर विभागाच्या १३३३ एए (२) कायद्यानुसार ज्या व्यक्तीकडे पॅन कार्ड आहे, तो व्यक्ती आधार कार्ड मिळविण्यासाठी पात्र आहे. त्याने आधार क्रमांक पॅन कार्डशी जोडणे बंधनकारक आहे.
हेही वाचा-उज्ज्वला योजनेत घोटाळा: लाखो लाभार्थ्यांकडून ३ ते ४१ सिलिंडरचा मासिक वापर - कॅग
काय आहे आधार व पॅन कार्ड ?
आधार कार्डामधून देशामधील रहिवाशांना देण्यात येणारा विशिष्ट ओळखपत्र क्रमांक दिला जातो. तर पॅन कार्डमधून इंग्रजी अक्षरांसह असलेला १० अंकी क्रमांक देण्यात येतो. पॅन कार्ड हे प्राप्तिकर विभागाकडून दिले जाते. तर आधार कार्ड हे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडून दिले जाते.