ETV Bharat / business

आजपासून 256 जिल्ह्यांत सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क अनिवार्य; वाचा हॉलमार्किंग म्हणजे काय.. - gold hallmarking news'

आजपासून 256 जिल्ह्यांत सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क अनिवार्य आहे. म्हणजेच ज्वेलर्स केवळ हॉलमार्क असलेलेच दागिने विकतील. हॉलमार्किंग 1 जूनपासून अनिवार्य करण्यात येणार होते. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे केंद्र सरकारने शिथिलता देत तारीख वाढवली होती.

hallmarking
हॉलमार्किंग
author img

By

Published : Jun 16, 2021, 9:43 AM IST

नवी दिल्ली - केंद्र सरकारनं आता सोन्याच्या दागिन्यांसाठी हॉलमार्क बंधनकारक केलं आहे. 16 जूनपासून देशात सोन्यावर हॉलमार्किंग अनिवार्य असेल. म्हणजेच ज्वेलर्स केवळ हॉलमार्क असलेलेच दागिने विकतील. हॉलमार्किंग 1 जूनपासून अनिवार्य करण्यात येणार होते. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे केंद्र सरकारने शिथिलता देत तारीख वाढवली होती. टप्प्याटप्प्याने याची अंमलबजावणी केली जाईल आणि सुरुवातीला ही योजना 256 जिल्ह्यात राबविली जात आहे, असे केंद्राकडून सांगण्यात आले आहे.

मंगळवारी 15 जूनला संध्याकाळी वाणिज्य आणि ग्राहक व्यवहार मंत्री पीयूष गोयल यांच्यासोबत ज्वेलर्सची बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. ग्राहक व्यवहार मंत्री पीयूष गोयल यांनी ट्विट केले की, ग्राहकांचे अधिक चांगले संरक्षण आणि त्यांचे समाधान करण्याचा सरकारचा सतत प्रयत्न असतो. 16 जून 2021 रोजी 256 जिल्ह्यांमध्ये सक्तीची हॉलमार्किंग राबविली जात आहे. या प्रकरणात ऑगस्ट 2021 पर्यंत कोणताही दंड आकारला जाणार नाही.

...यांना हॉलमार्किंगमधून सूट

हॉलमार्किंगची अनिवार्य व्यवस्था टप्प्याटप्प्याने राबविली जाईल आणि 256 जिल्ह्यांमध्ये प्रारंभीची अंमलबजावणी केली जाईल. जिथे मौल्यवान धातूची शुद्धता तपासण्यासाठी केंद्रे आहेत, असे ग्राहक व्यवहार सेक्रेटरी लीना नंदन म्हणाल्या. तथापि, 40 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उलाढाल असलेल्या दागिने उत्पादकांना अनिवार्य हॉलमार्किंगमधून सूट देण्यात येईल.

हॉलमार्किंग का गरजेचं?

हॉलमार्किंग हे मौल्यवान धातू शुद्धतेचे प्रमाणपत्र आहे. कोणत्याही दागिन्यांची शुद्धता पारखल्यानंतर लावण्यात येणारे बीआयएस (BIS) लोगो म्हणजे हॉलमार्क. यावरून सोन्याची शुद्धता लक्षात येते. हॉलमार्क सरकारी गॅरंटी आहे. ग्राहकांना नकली माल विकला जाऊ नये आणि व्यवसायावर लक्ष ठेवण्यासाठी हॉलमार्किंग महत्वाचं आहे.

हॉलमार्क म्हणजे काय?

  • हॉलमार्कवर BIS बीआयएसचा त्रिकोणी लोगो असतो.
  • तसेच त्यावर हॉलमार्किंग केंद्राचाही लोगो असतो.
  • सोन्याची शुद्धता लिहीलेली असते.
  • दागिने बनवल्याचे वर्ष लिहिले असते.
  • ज्वेलरचा लोगो असतो.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.