ETV Bharat / business

महिंद्राने परत मागविले १,५७७ डिझेल थर वाहने; इंजिनमध्ये आढळला दोष - महिंद्रा अँड महिंद्रा न्यूज

दक्षता म्हणून डिझेल थरमधील १,५७७ कॅमशॅफ्ट बदलणार असल्याचे महिंद्रा अँड महिंद्राने म्हटले आहे. हे इंजिनचे सुट्टे भाग ७ सप्टेंबर ते २५ डिसेंबर दरम्यान तयार करण्यात आले होते.

महिंद्रा अँड महिंद्रा
महिंद्रा अँड महिंद्रा
author img

By

Published : Feb 4, 2021, 5:40 PM IST

Updated : Feb 4, 2021, 6:37 PM IST

नवी दिल्ली - महिंद्रा अँड महिंद्राने गुरुवारी १,५७७ डिझेल थर वाहने परत मागविल्याचे जाहीर केले आहे. इंजिनच्या सुट्ट्या भागांमध्ये दोष आढळल्याने महिंद्राने हा निर्णय घेतला आहे.

दक्षता म्हणून डिझेल थरमधील १,५७७ कॅमशॅफ्ट बदलणार असल्याचे महिंद्रा अँड महिंद्राने म्हटले आहे. हे इंजिनचे सुट्टे भाग ७ सप्टेंबर ते २५ डिसेंबर दरम्यान तयार करण्यात आले होते. पुरवठादाराकडून मशिन सेटिंगमध्ये त्रुटी निर्माण झाली होती. त्याचा डिझेल थरमधील काही इंजिनवर परिणाम होऊ शकतो, असे एम अँड एमने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

हेही वाचा-तिसऱ्या तिमाहीत स्टेट बँकेच्या नफ्यामध्ये ७ टक्क्यांची घसरण

कंपनी गुणवत्तेची मानांकने कठोरपणे पाळते. त्यासाठी काळजी घेण्यात येते. त्यामुळे कंपनीने वाहने परत घेण्याचा निर्णय घेतला आहे. वाहनांची तपासणी आणि त्यामध्ये मोफतपणे अंशत: बदल करण्यात येणार असल्याचे एम अँड एम कंपनीने म्हटले आहे.

हेही वाचा-टेक महिंद्रा चालू वर्षात ५ हजार जणांना सेवेत घेणार

इंजिनच्या सुट्ट्या भागात दोष असलेल्या ग्राहकांशी संपर्क साधण्यात येणार असल्याचेही कंपनीने म्हटले होते. ग्राहकांना ही प्रक्रिया करण्यासाठी कोणताही अडथळा येणार नसल्याची कंपनीने ग्वाही दिली आहे. थारचे नव्या श्रेणीतील मॉडेल हे गतवर्षी २ ऑक्टोबरला लाँच झाले होते.

Last Updated : Feb 4, 2021, 6:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.