नवी दिल्ली - केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने एलपीजी सिलिंडर डीलर निवडण्याचे ग्राहकांना स्वातंत्र्य दिले आहे. एलपीजी सिलिंडर सर्व ग्राहकांना सहजरित्या मिळण्यासाठी हा उपक्रम घेतल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.
एलपीजी ग्राहकांचे सक्षमीकरण करण्यासाठी डीलर निवडण्याचे स्वातंत्र्य दिल्याचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने म्हटले आहे. त्यामुळे ग्राहक डीलर बदलून एलपीजी सिलिंडर भरू शकतात, असे मंत्रालयाने म्हटले आहे.
हेही वाचा-नायजेरिया सरकारकडून ट्विटर बंद; भारतीय अॅप 'कू'चा वापर सुरू
केवळ निवडक शहरात सुविधा सुरू-
ग्राहक गॅस सिलिंडर डिलिव्हरी मिळविताना डिलिव्हरी वितरकाच्या यादीमधून हव्या त्या डिलिव्हरी वितरकाची निवड करू शकतात. त्यासाठी ग्राहकांना वितरकाकडे जाण्याची गरड नाही. सध्या, ही सुविधा चंदीगड, कोईम्बुतर, गुडगाव, पुणे आणि रांची शहरात पथदर्शी पद्धतीने सुरू करण्यात आली आहे.
हेही वाचा-कोरोना लशींसह औषधावरील जीएसटी दराबाबत १२ जूनला जीएसटी परिषदेची बैठक
अशी मिळवा पोर्टेबल गॅस सिलिंडर योजना
एलपीजी रिफील अॅप किंवा कस्टमर पोर्टलमध्ये लॉग इन करावे. लॉग इन केल्यानंतर वितरकांची यादी दिसते. यादीमध्ये वितरकांची रेटिंग दिसते. त्यानुसार ग्राहक त्यांच्या परिसरात गॅस सिलिंडर मिळविण्यासाठी वितरकाची निवड करू शकतात.
जर ग्राहकाला वितरकाची बदलेली निवड रद्द करायची असेल तर ती विनंती तीन दिवसानंतर रद्द करता येते. जर ही विनंती रद्द केली नाही, तर गॅस कनेक्शन हे नवीन वितरकाकडे वर्ग केले जाते. गॅस सिलिंडर वितरक बदलण्याची सोय मोफत आहे. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही.