नवी दिल्ली - टाळेबंदी ४.० मध्ये फ्लिपकार्ट, अॅमेझॉनसह सर्व ई-कॉमर्स कंपन्यांनी कंटेन्टमेंट झोन वगळता सर्व झोनमध्ये ऑनलाईन विक्री सुरू केली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार ई-कॉमर्स कंपन्यांना जीवनावश्यकसह बिगर जीवनावश्यक वस्तुंची ऑनलाईन विक्री करता येणार आहे.
टाळेबंदीच्या पहिल्या टप्प्यात (२५ मार्च ते ३ मे रोजीपर्यंत) ई-कॉमर्स कंपन्यांना केवळ किराणा, आरोग्य आणि वैद्यकीय वस्तुंची विक्री करण्याला परवानगी देण्यात आली होती. तर टाळेबंदीच्या दुसऱ्या टप्प्यात (४ मे ते १७ मे) केवळ केशरी आणि हरित झोनमध्ये ऑनलाईन वस्तू विकण्याला परवानगी होती. तर, रेडझोनमध्ये केवळ जीवनावश्यक वस्तुंच्या विक्रीला केंद्रीय गृहमंत्रालयाने परवानगी दिली होती. यामध्ये दिल्ली, मुंबई, बंगळुरू, पुणे आणि हैदराबादचा समावेश आहे.
हेही वाचा-महामारीने बेरोजगारीत वाढ : उबेरच्या ३ हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा
सर्व झोनमध्ये वस्तू विक्रीला परवानगी देण्याच्या निर्णयाचा फायदा सहा लाखांहून अधिक किरकोळ विक्रेत्यांना होणार असल्याचे अॅमेझॉन इंडियाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
हेही वाचा-खासगी कंपन्यांतील कर्मचाऱ्यांची वाढणार चिंता; गृह मंत्रालयाने 'तो' आदेश घेतला मागे