नवी दिल्ली - देशातील सर्वात मोठी जीवनविमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) २ टक्के हिस्सा खुल्या बाजारात विकला आहे.
एलआयसीने १३.०८ कोटी शेअर हे आयसीआयसीआय बँकेला विकले आहेत. हा एलआयसीमधील २.००२ टक्के हिस्सा आहे. ही माहिती एलआयसीने शेअर बाजाराला दिली आहे. हिस्सा विकल्याने एलआयसीचा कंपनीमधील हिस्सा ८.७४ टक्क्यांवरून ६.७४ टक्के झाला आहे. शेअर बाजारात आयसीआयसीआय बँकेचे शेअर १.२८ टक्क्यांनी वधारून ५२०.२० रुपये आहे.
संबंधित बातमी वाचा-विरोधकांनी एलआयसीचे खासगीकरण रोखावे, कामगार नेत्यांची मागणी
एलआयसीची १९५६ मध्ये स्थापना झाली. एलआयसीकडून ग्रामीण भागासह सामाजिक आणि आर्थिक दुर्बल घटकांना वाजवी दरात जीवनविमा देण्यात येतो. देशाला प्राधान्य आणि वाजवी दरात विमाधारकांना परतावा देणे, यासाठी एलआयसीने गुंतवणूक केली आहे. एलआयसीने ३१ मार्च २०१९ पर्यंत २९ लाख ८४ हजार ३३१ कोटींची गुंतवणूक केली आहे. जर निर्गुंतवणूक करण्यात आली तर त्याचा परिणाम विमाधारकांना होणार आहे.
हेही वाचा-एलआयसीचा हिस्सा विकून 'एवढे' कोटी रुपये मिळण्याची सरकारला अपेक्षा
एलआयसीतील हिस्सा विकण्याला कर्मचारी संघटनेचा विरोध
भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) निर्गुंतवणुकीला ऑल इंडिया एलआयसी एम्प्लॉईज फेडरेशनने 25 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. या पत्रातून संघटनेने एलआयसीमधील निर्गुंतवणूक थांबविण्याची मागणी केली आहे. निर्गुंतवणुकीचे पाऊल हे पंतप्रधानांनी सांगितलेल्या आत्मनिर्भर भारत मोहिमेविरोधी असल्याचे संघटनेने पत्रात म्हटले आहे.
एलआयसीचा हिस्सा विकूण ९० हजार कोटी मिळण्याची सरकारची अपेक्षा-
केंद्र सरकारने निर्गुंतवणुकीतून सुमारे २ लाख कोटी रुपये जमविण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. एकट्या भारतीय आयुर्विमा महामंडळामधील (एलआयसी) ६ ते ७ टक्के हिस्सा विकून सरकारला ९० हजार कोटी रुपये मिळविता येणार आहेत. निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट वेळेवर पूर्ण होईल, असा विश्वास मुख्य आर्थिक सल्लागार के. व्ही. सुब्रमण्यन यांनी व्यक्त केला.