ETV Bharat / business

अनवाणी पायाने शिक्षण ते रॉकेट मॅन; 'अशी' आहे इस्त्रोच्या संचालकांची प्रेरणादायी झेप - भारतीय अंतराळ संशोधन संस्था

इस्रोने १५ फेब्रुवारी २०१७ मध्ये एकाचवेळी १०४ सॅटेलाईटचे यशस्वीपणे प्रक्षेपण केले होते. यामध्ये सिवान यांनी मोलाची कामगिरी बजाविली होती. त्यांनी सरकारी शाळेत शिक्षण व शेतकरी कुटुंबात असूनही आजव परिस्थितीपुढे हार मानली नाही. त्यांचा आजवरचा प्रवास हा थक्क करणारा आहे.

संग्रहित - इस्रोचे संचालक के.सिवान
author img

By

Published : Sep 7, 2019, 6:58 PM IST

Updated : Sep 7, 2019, 7:54 PM IST

नवी दिल्ली - चांद्रयान मोहिमेतील शेवटच्या टप्प्यात विक्रम यानाचा संपर्क तुटल्यानंतर इस्रोचे संचालक के.सिवान यांच्या डोळ्यातील अश्रू आपण पाहिले. यातून त्यांची संवेदनशीलता आणि कामावरील प्रेम दिसून येते. अनवाणी पायाने शालेय शिक्षण पूर्ण करणारे सिवान यांचा आजवरचा प्रवास पाहिला तर प्रेरणादायी असाच आहे.

के. सिवान यांचा शेतकरी कुटुंबात १४ एप्रिल १९५७ ला जन्म झाला. ते त्यांच्या कुटुंबामधील पहिले पदवीधर आहेत. ते तामिळनाडूमधील कन्याकुमारी जिल्ह्यातील सराक्कालविलाईचे रहिवासी आहेत. त्यांना एक भाऊ आणि दोन बहिणी आहेत. त्यांच्या पत्नी गृहिणी असून त्यांना दोन मुले आहेत. लहानपणी ते आंब्याच्या बागेत वडिलांना मदत करत होते.

स्पेशल स्टोरी- अनवाणी पायाने शिक्षण ते रॉकेट मॅन

मद्रासच्या एमआयटीमध्ये प्रवेश घेतला तेव्हा त्यांनी पहिल्यांदा पँट घातली. त्यापूर्वी ते धोती नेसत असत. लहानपणी त्यांनी कधीही बुट अथवा चप्पल घातली नाही. ते अनवाणी शाळेत जात असत. एमआयटीमध्ये शिक्षण घेण्यासाठी त्यांच्या वडिलांना जमीन विकावी लागली. जे मला मिळाले नाही, त्याबद्दल त्रास वाटला नाही. जे काही उत्कृष्ट करता येईल, ते केल्याचे सिवान सांगतात.

शिक्षण परवडणारे नसल्याने त्यांना अभियांत्रिकीऐवजी बीएसस्सी करावी लागली. बी.टेकनंतर त्यांनी नोकरीसाठी शोध घेतला. मात्र, एअरोनॉटिकल अभियांत्रिकीमध्ये मर्यादित नोकऱ्या असल्याने त्यांची संधी हुकली. त्यांना हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लि. आणि नॅशनल एअरॉनॉटिक्स लि. मध्येही नोकरी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी पुढील शिक्षण आयआयएसस्सीमधून घेतले.

हेही वाचा-भारत-चीनमध्ये विविध क्षेत्रांच्या व्यापारावर आजपासून तीन दिवस होणार चर्चा

करिअर-

  • के.सिवान हे इस्रोच्या पोलर सॅटेलाईट लाँच व्हिकलमध्ये (पीएसएलव्ही) १९८२ ला रुजू झाले.
  • त्यांची इस्रोच्या लिक्विड प्रोप्ल्शन सिस्टिम्स सेंटरच्या संचालकपदी २०१४ ला नियुक्ती झाली.
  • त्यांनी २०१५ मध्ये विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे (व्हीएसएससी) संचालक म्हणून जबाबदारी सांभाळली. इस्रोचे संचालक म्हणून २०१८ मध्ये नियुक्ती झाली.

हेही वाचा-हुवाईचा ५ जी मध्ये समावेश करताना योग्य विचार करायला हवा

सन्मान -

  • सिवान यांचे अनेक संशोधन विविध जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे.
  • त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
  • चेन्नईच्या सत्यभामा विद्यापीठाने त्यांना डॉक्टर ऑफ सायन्सने सन्मानित करण्यात आले. तर १९९९ मध्ये डॉ. विक्रम साराभाई रिसर्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

हेही वाचा-देशाची अर्थव्यवस्था ५ लाख कोटी डॉलरची करण्याकरिता 'हा' ठरू शकतो मास्टरस्ट्रोक

इस्रोमधील कामगिरी-

  • इस्रोचा 'वर्कहॉर्स' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पीएसएलव्ही प्रकल्पाचा विकास.
  • पीएसएलव्ही प्रकल्पामुळेच इस्रो जीएसएलव्ही, जीएसएलव्ही-एमके३ आणि आरव्हीएल-टीडीचे यशस्वी प्रक्षेपण करू शकले.
  • ते सितारा या सहामितीय ट्राजेक्टरी सिम्युलेशन सॉफ्टवेअरचे मुख्य रचनाकार आहेत. हे सॉफ्टवेअर इस्रोच्या उपग्रह लाँचिंगचा महत्त्वाचा कणा मानले जाते.
  • त्यांनी रॉकेटच्या प्रक्षेपणासाठी नवसंधोधन करून यंत्रणा विकसित केली आहे. यामुळे वर्षाच्या कोणत्याही दिवशी व कोणत्याही हवामानात रॉकेटचे प्रक्षेपण करण्यात येते.
  • रॉकेट मॅन म्हणून त्यांना ओळखले जाते. कारण त्यांनी क्रायोजेनिक इंजिन, पीएसएलव्ही, जीएसएलव्ही आणि पुनर्रवापर होऊ शकणाऱ्या आरएलसी कार्यक्रमांचा विकास केला आहे.
  • इस्रोने १५ फेब्रुवारी २०१७ मध्ये एकाचवेळी १०४ सॅटेलाईटचे यशस्वीपणे प्रक्षेपण केले होते. यामध्ये त्यांनी मोलाची कामगिरी बजाविली होती.
  • चांद्रयान मोहिमेची रचना व अंमलबजावणीत मुख्य जबाबदारी

Intro:Body:

नवी दिल्ली -  चांद्रयान मोहिमेतील शेवटच्या टप्प्यात विक्रम यानाचा संपर्क तुटल्यानंतर इस्रोचे संचालक के.सिवान यांच्या  डोळ्यातील अश्रू आपण पाहिले. यातून त्यांची संवेदनशीलता आणि कामावरील प्रेम दिसून देते. अनवाणी पायाने शालेय शिक्षण पूर्ण करणारे सिवान यांचा आजवरचा प्रवास पाहिला तर  प्रेरणादायी असाच आहे.

के. सिवान यांचा शेतकरी कुटुंबात १४ एप्रिल १९५७ ला जन्म झाला. ते त्यांच्या कुटुंबामधील पहिले पदवीधर ठरले आहेत. ते तामिनाडूमधील कन्याकुमारी जिल्ह्यातील सराक्कालविलाईचे रहिवासी आहेत. त्यांना एक भाऊ आणि दोन बहिणी आहेत.  त्यांच्या पत्नी गृहिणी असून त्यांना दोन मुले आहेत. लहानपणी ते आंब्याच्या बागेत वडिलांना मदत करत होते.

मद्रासच्या एमआयटीमध्ये प्रवेश घेतला तेव्हा त्यांनी पहिल्यांदा पँट घातली. त्यापूर्वी ते धोती नेसत असत. लहानपणी त्यांनी कधीही बुट अथवा चप्पल घातली नाही. ते अनवाणी शाळेत जात असत.  एमआयटीमध्ये शिक्षण घेण्यासाठी त्यांच्या वडिलांना जमीन विकावी लागली.  जे मला मिळाले नाही, त्याबद्दल त्रास वाटला नाही. जे काही उत्कृष्ट करता येईल, ते केल्याचे सिवन सांगतात.

 शिक्षण परवडणारे नसल्याने त्यांना अभियांत्रिकीऐवजी बीएसस्सी करावी लागली. बी.टेकनंतर त्यांनी नोकरीसाठी शोध घेतला. मात्र एअरोनॉटिकल अभियांत्रिकीमध्ये मर्यादित नोकऱ्या असल्याने त्यांची संधी हुकली. त्यांना हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लि. आणि नॅशनल एअरॉनॉटिक्स लि. मध्येही नोकरी मिळाली नाही. त्यामुळे पुढील शिक्षण आयआयएससीमधून घेतले.

करिअर

के.सिवन हे इस्रोच्या पोलर सॅटेलाईट लाँच व्हिकलमध्ये (पीएसएलव्ही) १९८२ ला रुजू झाले.

त्यांची इस्रोच्या लिक्विड प्रोप्ल्शन सिस्टिम्स सेंटरच्या संचालकपदी २०१४ ला नियुक्ती झाली.

त्यांनी २०१५ मध्ये विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे (व्हीएसएससी) संचालक म्हणून जबाबदारी सांभाळली.  इस्रोचे संचालक म्हणून २०१८ मध्ये नियुक्ती झाली.

सन्मान -

सिवान यांचे अनेक संशोधन  विविध जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. तसेच त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. चेन्नईच्या सत्यभामा विद्यापीठाने त्यांना डॉक्टर ऑफ सायन्सने सन्मानित करण्यात आले. तर १९९९ मध्ये श्री हरी डॉ. विक्रम साराभाई रिसर्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

इस्रोमधील कामगिरी-

इस्रोचा वर्कहॉर्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पीएसएलव्ही प्रकल्पाचा विकास. यामुळे इस्रो जीएसएलव्ही, जीएसएलव्ही-एमके३ आणि आरव्हीएल-टीडीचे यशस्वी प्रक्षेपण करू शकले.

ते सितारा या सहामितीय ट्राजेक्टरी सिम्युलेशन सॉफ्टवेअरचे मुख्य रचनाकार आहेत. हे सॉफ्टवेअर इस्रोच्या उपग्रह लाँचिंगचा महत्त्वाचा कणा मानले जाते.

त्यांनी रॉकेटच्या   प्रक्षेपणासाठी नवसंधोधन करून यंत्रणा विकसित केली आहे. यामुळे वर्षाच्या कोणत्याही दिवशी व कोणत्याही हवामानात रॉकेटचे प्रक्षेपण करण्यात येते.

रॉकेट मॅन म्हणून त्यांना ओळखले जाते. कारण त्यांनी क्रायोजेनिक इंजिन, पीएसएलव्ही, जीएसएलव्ही आणि पुनर्वापर होवू शकणाऱ्या आरएलसी कार्यक्रमांचा विकास केला आहे. इस्रोने १५ फेब्रुवारी २०१७ मध्ये एकाचवेळी १०४ सॅटेलाईटचे यशस्वीपणे प्रक्षेपण केले होते. यामध्ये त्यांनी मोलाची कामगिरी बजाविली होती.   

Conclusion:
Last Updated : Sep 7, 2019, 7:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.