तिरुवनंतपुरम – पतंजलीचे आयुर्वैदिक औषध वादाच्या भोवऱ्यात सापडल्यानंतर काही दिवसानंतर केरळ उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आयुर्वेदिक औषधांमध्ये प्राणघातक घटक असलेल्या याचिकेवर केरळ उच्च न्यायालय विचार करणार आहे.
तिरवनंतपुरम दक्षता विशेष न्यायालयाने आयुर्वैदिक औषधी कंपन्यांविरोधातील याचिकेवर विचार करण्याचा निर्णय घेतला आहे. केरळमधील काही आयुर्वेदक कंपन्या औषध निर्मितीत मानवी जीवनाला अपायकारक औषध वापरत असल्याची याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेवर औषध निरीक्षक, माजी आयुर्वैदिक औषध उप निरीक्षक इत्यादींना न्यायालयाने बाजू मांडण्याचे आदेश दिले होते.
यकृत आणि मधुमेहाच्या आयुर्वैदिक औषधामध्ये अवजड धातुंचा वापर करण्यात येत असल्याचे याचिकेत म्हटले होते. याचिकाकर्त्याने औषधी निरीक्षक हे कंपन्यांनाकडून लाच घेतात, असे म्हटले आहे.