ETV Bharat / business

गुणवत्तेच्या आधारे आम्हाला पारखा ; हुवाईचा भारताला सल्ला - Jay Chen

देशात यंदा ५ जीसाठी चाचणी घेण्यात येणार आहे. त्यामध्ये केंद्रीय दूरसंचार विभाग हुवाईला सहभागी करून घेण्याबाबत साशंकता आहे.

हुवाई
author img

By

Published : Jun 24, 2019, 7:59 PM IST

नवी दिल्ली - चीन-अमेरिकेमध्ये व्यापारी युद्ध सुरू आहे. सुरक्षेला धोका असल्याने अमेरिकेने हुवाईच्या उत्पादनांवर बंदी घातली आहे. अशा स्थितीत हुवाईबाबतचा मुद्दा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पेओ हे भारताच्या दौऱ्यामध्ये उपस्थित करण्याची शक्यता आहे. त्यामुळे समान पातळीवर भारताने हुवाईला ऑफर द्यावी, अशी हुवाईच्या कार्यकारी अधिकाऱ्याने अपेक्षा व्यक्त केली आहे.

देशात यंदा ५ जीसाठी चाचणी घेण्यात येणार आहे. त्यामध्ये केंद्रीय दूरसंचार विभाग हुवाईला सहभागी करून घेण्याबाबत साशंकता आहे. हुवाई इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जय शेन म्हणाले, भारताने दबावाखाली चुकीचा निर्णय घेवू नये. जगाबरोबर खुला आणि सहकार्याचा दृष्टीकोन भारताने कायम ठेवावा. आगामी दहा वर्षे भारताला प्रगतीसाठी सोन्यासारखी ठरू शकतात. भारताने २०२५ पर्यंत १ लाख कोटी डिजीटल अर्थव्यवस्था होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळवावी, असेही शेन म्हणाले.

पॉम्पेओ यांच्या भेटीदरम्यान हुवाईला ५ जीमध्ये सहभागी करून घेण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. हा निर्णय घेण्याबाबत भारताने यापूर्वीच समिती स्थापन केली आहे.

हुवाई संकटात!
हुवाई ही चीन व अमेरिकेच्या व्यापारी युद्धात सापडली आहे. ट्रम्प प्रशासनाने चीनच्या दूरसंचार कंपन्यांच्या तंत्रज्ञानावर बंदी घातल्याने हुवाईच्या उत्पादनांना फटका बसत आहे. हुवाईच्या उत्पनादनामध्ये हेरगिरी करणारी गुप्त मशिन्स बसविल्याचा अमेरिकेला संशय आहे. हे सर्व आरोप हुवाईने फेटाळून लावले आहेत.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.