नवी दिल्ली - अमेरिकेच्या बहुराष्ट्रीय कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनच्या जानसीन या कोरोना लशीला आपत्कालीन स्थितीत परवानगी दिली आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ट्विट करून दिली आहे.
जानसीन या लशीला भारतात परवानगी दिल्याचे आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की भारताची लशीची बास्केट विस्तारली आहे. जॉन्सन अँड जॉन्सनची एकवेळ डोस आवश्यक असलेल्या कोरोना लशीला भारताने आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. भारतात आता आपत्कालीन वापरासाठी 5 कोरोना लशी आहेत. त्यामुळे भारताचे कोरोनाविरोधात लढ्याचे सामर्थ्य वाढणार आहे.
हेही वाचा-धक्कादायक! ब्ल्यूटूथ एअरफोनचा कानात स्फोट झाल्याने राजस्थानमधील तरुणाचा मृत्यू
डेल्टा व्हेरिएंटवरही जानसीन प्रभावी
कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंटवर नावाचा नवीन प्रकार आला आहे. त्यावर आमच्या लसीचा डोस प्रभावी असल्याचा दावा जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीकडून नुकतेच करण्यात आला आहे. ही लस घेतल्याच्यानंतर न्यूट्रिलायझिंग अँटीबॉडीचे प्रमाण दिसून आले आहे. या अँटीबॉडीचे प्रमाण किमान आठ महिने प्रभावी राहत असल्याची माहितीही कंपनीने दिली आहे. ही लस 85 वर्षांवरील नागरिकांना, ज्याला गंभीर आजार आहे त्यांना आणि कोरोना झाल्याने ज्याची परिस्थिती गंभीर आहे त्यांच्यासाठी प्रभावी असल्याचा दावाही कंपनीने केला आहे.
हेही वाचा-जेईई मेन्सच्या तिसऱ्या फेरीचा निकाल जाहीर; 17 विद्यार्थ्यांनी केली शंभरी पार
जानसीन लशीबाबत महत्त्वाचे मुद्दे
- अमेरिकेची औषध कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनने तेलंगणामधील बायॉलॉजिकल ई लिमिटेडबरोबर करार केला आहे. या करारानुसार बायॉलॉजिकल ई लिमिटेड जॉन्सन अँड जॉन्सनच्या कोरोना लशीचे उत्पादन करणार आहे.
- जॉन्सन अँड जॉन्सनच्या जानसीन या कोरोना लसीला अमेरिका, युरोपियन युनियन, थायलंड आणि दक्षिण आफ्रिकेने मान्यता दिली आहे. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या माहितीनुसार बायोलॉजिकल ई कंपनी ही जागतिक कोरोना लशीच्या पुरवठा साखळीचा महत्त्वाचा भाग असणार आहे.
- लस निर्मितीसाठी विविध सेवा असणारी उत्पादन प्रकल्पे ही विविध उपखंडांमध्ये आहेत. अमेरिकेची औषध कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनने एकवेळ डोस असलेल्या जानसीनच्या वैद्यकीय चाचणीसाठी भारत सरकारबरोबर चर्चा सुरू असल्याचे ५ एप्रिलला म्हटले होते.
- अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने जॉन्सन अँड जॉन्सनच्या कोरोनाविरोधातील लशीला मान्यता दिली आहे. या लशीच्या एकवेळच्या डोसला आपत्कालीन स्थितीत फेब्रुवारीमध्ये मान्यता देण्यात आली आहे.
- जानसीन लशीचे वैशिष्ट्य म्हणजे ही लस फ्रीजच्या तापमानातही साठवणे शक्य आहे.
- तिचा एक डोसही घ्यावा लागतो.
हेही वाचा-झारखंड सरकार पाडण्यात महाराष्ट्रातील माजी मंत्र्यांचा हात?; पोलीस पाठवणार नोटीस