नवी दिल्ली - कोरोनाचा प्रसार वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर घरातून काम करण्याकडे अनेकांचा कल वाढला आहे. रिलायन्स जिओने ग्राहकांकरिता धमाकेदार ऑफर आणली आहे. नवे ब्रॉडबँड कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकांना एक महिन्याची सेवा देण्यात येणार आहेत. तर जुने ब्रॉडबँडचे कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकांना दुप्पट डाटा देण्याचे जाहीर केले आहे.
प्रत्येकाने घरीच थांबावे यासाठी जिओकडून १० एमबीपीएसच्या इंटरनेटची सेवा परवडणाऱ्या दरात येते. त्यासाठी सेवा शुल्क आकारण्यात येणार नसल्याचे रिलायन्स इंडस्ट्रीजने म्हटले आहे.
हेही वाचा-दिलासादायक! रिलायन्स रोज १ लाख मास्कचे करणार उत्पादन
जिओफायबर ब्रॉडबँड ग्राहकांना इन्स्टॉलेशनसाठी २ हजार रुपये द्यावे लागणार आहेत. तर १,५०० रुपये परत कनेक्शन कट करताना परत मिळणार आहेत. तर राऊटवर हे परत मिळू शकणाऱ्या कमीत कमी ठेव रक्कमेवर मिळू शकणार आहे. यापूर्वी बीएसएनएलनेही ब्रॉ़डबँडच्या नव्या ग्राहकांना मोफत सेवा देण्याचे जाहीर केले आहे.
हेही वाचा-कोरोनाचा हाहाकार सुरू असतानाही शेअर बाजार सुरू : गुंतवणूकदारांना 'ही' आहे भीती