नवी दिल्ली - इंडिगोचे देशातील केवळ ६० टक्के विमान उड्डाणे रविवारी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्युची रविवारी घोषणा केली आहे. त्या पार्श्वभूमीवर इंडिगोने विमान उड्डाणांची संख्या कमी केली आहे.
जनता कर्फ्युचे रविवारी सकाळी सात ते रात्री ९ वाजेपर्यंत पालन करावे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केले आहे. जगभरात विमान प्रवासावर निर्बंध लादण्यात आले आहे. बहुतांश आंतरराष्ट्रीय उड्डाणे स्थगित केल्याचे इंडिगोने म्हटले आहे.
हेही वाचा-कोरोनाने आर्थिक संकट : एअर इंडियाकडून कर्मचाऱ्यांचे भत्ते १० टक्क्यांनी कमी
संसर्गजन्य कोरोनाचा प्रसार होत असताना प्रवाशांच्या संख्येत घट झाली आहे. अशा स्थितीत देशातील विमानांची २५ टक्के उड्डाणे कमी होणार असल्याचे इंडिगोने म्हटले आहे. मागणीचा सतत आढावा घेत त्याप्रमाणे विमान उड्डाणे सुरू ठेवण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
हेही वाचा-कोरोनाचा ताण:आरबीआय ३० हजार कोटींचे खरेदी करणार सरकारी रोखेहेही वाचा-