ETV Bharat / business

'जॅक मा'ने गमाविला चीनमधील श्रीमंताच्या यादीतील अव्वल क्रमांक - जॅक मा संपत्ती न्यूज

हरुण संस्थेने जगातील सर्वात श्रीमंताची यादी आज जाहीर केली आहे. या यादीप्रमाणे जॅक मा यांची ५५ अब्ज डॉलर संपत्ती  आहे.

Jack Ma
जॅक मा
author img

By

Published : Mar 2, 2021, 8:57 PM IST

हैदराबाद - चीनच्या नियामक संस्थेकडून कठोर परीक्षण झाल्याचा अलीबाबा आणि अँट ग्रुपचे संस्थापक जॅक मा यांना मोठा फटका बसला आहे. जॅक मा हे पूर्वीप्रमाणे चीनमधील सर्वाधिक श्रीमंत राहिले नाहीत. ही माहिती हरुण संस्थेने जाहीर केलेल्या श्रीमंताच्या यादीतून समोर आली आहे.

हरुण संस्थेने जगातील सर्वात श्रीमंताची यादी आज जाहीर केली आहे. या यादीप्रमाणे जॅक मा यांची ५५ अब्ज डॉलर संपत्ती आहे. नोनग्फू स्पिंग झोंग शानशान, टेन्सेंट होल्डिंगचे पोनी मा आणि ई-कॉमर्स अपस्टार्ट पिंडूडूओचे कोलीन हुयांग यांच्यानंतर जॅक मा यांचा चीनमधील श्रीमंतामध्ये चौथा क्रमांक आहे.

हेही वाचा-सोन्याच्या दरात प्रति तोळा ६७९ रुपयांची घट ; चांदी १,८४७ रुपयांनी स्वस्त

यामुळे जॅक मा हे सापडले अडचणीत!

गतवर्षी चीनमध्ये ५७ वर्षीय जॅक मा हे सर्वाधिक श्रीमंत होते. त्यांचा यंदा चौथा क्रमांक आला आहे. दरम्यान, माध्यमातील वृत्तानुसार जॅक मा यांनी २३ ऑक्टोबर २०२० मध्ये चीनच्या नियामक संस्थेवर टीका केली होती. त्यानंतर अँट ग्रुपच्या आयपीओवर चीनकडून निर्बंध लादण्यात आले आहेत. चीनच्या नियामक संस्थेने अँट ग्रुपवर कठोर नियम लागू करण्यास सुरुवात केली आहे. मा हे अचानक माध्यमामधून काही महिने गायब झाले होते. त्यानंतर जानेवारीमध्ये त्यांचा व्हिडिओ समोर आला होता. जॅक मा यांच्या संपत्तीत घट झाली असली तरी त्यांचा सामाजिक प्रभाव वाढत असल्याचे हरुणने अहवालात म्हटले आहे.

हेही वाचा-स्टेट बँकेपाठोपाठ कोटक महिंद्रा बँकेकडून गृहकर्जाच्या व्याजदरात कपात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.