नवी दिल्ली - प्राप्तिकर विभागाने अभिनेत्री तापसी पन्नू आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या मालमत्तांवर राजकीय कारणाने छापे मारल्याची टीका होत आहे. त्यावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या घरावर २०१३ मध्येही प्राप्तिकर विभागाने छापे मारल्याचे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे. त्या इंडियन वूमेन प्रेस कॉर्समध्ये बोलत होत्या.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, जर कोणी चुकवेगिरी करत असेल तर राष्ट्रहितासाठी त्याकडे पाहावे लागते. मात्र, मी वैयक्तिक टिपण्णी करत नाही. मात्र, ज्यांचे नाव घेतली जातात, त्यांच्या घरावर २०१३ मध्येही छापेही प्राप्तिकर विभागाकडून टाकण्यात आले होते. तेव्हा समस्या नव्हती. मात्र, आता समस्या आहे.
हेही वाचा-अर्थसंकल्पीय अधिवेशन : सभागृहातील सर्व घडामोडी पाहा एका क्लिकवर
२०१३ च्या छाप्यातून काय समोर आले होते, याची त्यांनी माहिती दिली नाही. सात वर्षानंतर कोणत्या कारणाने छापे टाकण्यात आले याची माहितीही त्यांनी दिली नाही.
प्राप्तिकर विभागाकडून ३०० ठिकाणी छापे-
हेही वाचा-दहावी आणि बारावीच्या वेळापत्रकात मोठा बदल; सीबीएसईची माहिती
प्राप्तिकर विभागाने ३ मार्चला अभिनेत्री तापसी व दिग्दर्शक कश्यप यांच्या मुंबईमधील घरांवर छापे टाकले होते. त्यांनी फँटम फिल्म नावाचे प्रोडक्श्न हाऊस लाँच केले आहे. प्राप्तिकर विभागाकडून पुणे, मुंबईसह ३०० ठिकाणी फँट फिल्म्सच्या करचुकवेगिरी प्रकरणात छापे टाकण्यात आले आहेत. त्यामध्ये रिलायन्स एन्टरटेनमेंट ग्रुपचे सीईओ शिबाशीष सरकार आणि सेलिब्रिटीकडे काम करणारे काही व्यक्ती, व क्वान कंपन्यांच्या मालमत्तांचा छाप्यामध्ये समावेश आहे.
दरम्यान, तापसी आणि अनुराग कश्यप हे सरकारविरोधातील विविध मुद्द्यावर स्पष्टपणे माध्यमातून मत व्यक्त करत असतात.