ETV Bharat / business

कोरोनाविरोधातील लसीकरण केंद्राची माहिती गुगलकडून मॅपसह सर्चवर देण्यात येणार - google India on vaccination centre

सर्च इंजिनवर कोरोना लसीकरण केंद्राची लवकरच माहिती दिली जाणार असल्याचे गुगलने म्हटले आहे. देशामध्ये १६ जानेवारीपासून २.६ कोटी नागरिकांना कोरोनाविरोधातील कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लस देण्यात आली आहे.

Google search
गुगल सर्च
author img

By

Published : Mar 13, 2021, 4:35 PM IST

नवी दिल्ली -कोरोनाच्या लढ्यात लसीकरण केंद्राची माहिती वापरकर्त्यांना सर्च, मॅप्स आणि असिस्टंटकडून मिळण्यासाठी गुगल इंडियाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी गुगल इंडिया आरोग्य मंत्रालय, बिल आणि मेलिंडा गेट्स फांउडेशनची मदत घेत आहे.

गुगल सर्च इंजिनवर कोरोना लसीकरण केंद्राची लवकरच माहिती दिली जाणार असल्याचे गुगलने म्हटले आहे. देशामध्ये १६ जानेवारीपासून २.६ कोटी नागरिकांना कोरोनाविरोधातील कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लस देण्यात आली आहे.

कोरोनाचे समाजासमोर अद्यापही आव्हान आहे. आम्ही महामारीतील मोक्याच्या वेळी देशातील सरकारी संस्थांबरोबर सर्व शक्य त्या पद्धतीने काम करण्यासाठी बांधील आहोत. मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम राबविल्याने पूर्वस्थिती होण्यासाठी मदत होणार आहे.

हेही वाचा-१ एप्रिल २०२२ नंतर १५ वर्षे जुनी सरकारी वाहने भंगारात निघणार

  • केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या त्वरित जोखीम प्रतिसाद पथकाबरोबर जवळून काम सुरू आहे.
  • समाज माध्यमातील चुकीच्या माहितीचा मागोवा घेतला जात आहे. तर कोरोनाविरोधीतील लसीकरण आणि महामारीबाबत वैज्ञानिक माहिती सर्व ठिकाणी दिली जात असल्याचे गुगल इंडियाने म्हटले आहे.
  • सरकारने लसीकरणाची मोहिम व्यापकस्तरावर सुरू केली आहे. अशावेळी गुगलकडून नागरिकांनी वेळेवर माहिती जाण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.
  • पहिल्या टप्प्यात कोरोना लसीकरण मोहिम पार पडल्यानंतर गुगलने नॉलेज पॅनेल सुरू केले आहेत. त्यामधून कोरोनाविरोधातील लसीकरणाबाबत प्रश्नांची माहिती मिळते. यामध्ये लशीची परिणामकारकता, सुरक्षितता, वितरण, दुष्परिणाम याविषयी सविस्तर माहिती देण्यात येत आहे. ही माहिती तमीळ, तेलुगु, मल्याळम, कन्नड, मराठी, गुजराती, बंगाली आणि हिंदी या आठ भाषांचा समावेश आहे.

हेही वाचा-प्रत्येकाला लस मिळेल, अशी आशा- रतन टाटा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.