नवी दिल्ली – कोरोनाच्या संकटात आघाडीवर लढणाऱ्या डॉक्टर आणि परिचारिकांसाठी इंडिगोने खास सवलत आज जाहीर केली आहे. डॉक्टर व परिचारिकांना विमान तिकिटावर 25 टक्के सवलत कंपनीकडून देण्यात येणार आहे.
विमान तिकिटात सवलत घेण्यासाठी डॉक्टर व परिचारिकांकडे रुग्णालयाने दिलेले ओळखपत्र असणे आवश्यक राहणार आहे. ही ऑफर इंडिगोच्या वेबसाईटवरून वेबसाईटवरून देण्यात येणार आहे. इंडिगोची तिकीट दरातील सवलत 1 जूलै 2020 ते 31 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.
इंडिगोने टफ कुकी (मनाने व शरीराने खंबीर) असे या अभियानाला नाव दिलेले आहे. यामध्ये डॉक्टर व परिचारिकांच्या नावाची घोषणा करणे, त्यांच्या पीपीईवर विशेष स्टिकर लावणे आणि त्यांचे स्वागत करणे अशा गोष्टी करण्यात येणार आहेत.
दरम्यान, देशांगतर्गत टाळेबंदीमुळे दोन महिने बंद असलेली विमान सेवा 25 मेपासून सुरू झाली आहे. मात्र, विमान मार्गांच्या फेऱ्यावर मर्यादा घालून देण्यात आलेली आहे. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवा अद्याप सुरू झाली नाही.
देशात 950 हून अधिक डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 20 हून अधिक डॉक्टरांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.