ETV Bharat / business

कोरोनाची आर्थिक झळ : इंडिगोकडून वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात

author img

By

Published : Mar 19, 2020, 5:03 PM IST

कंपनीची इच्छा नसतानाही आणि दु:खाने कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये बँड ए आणि बी यांना वगळण्यात आल्याचे इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी म्हटले आहे.

IndiGo
इंडिगो

नवी दिल्ली - कोरोना महामारीने विमान वाहतूक क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अशा स्थिती इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोनोजॉय दत्ता यांनी वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करणार असल्याचे जाहीर केले. तर स्वत:चे वेतनही २५ टक्क्यांनी कमी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोनोजॉय दत्ता यांनी कर्मचाऱ्यांना ई-मेल करून कंपनीच्या स्थितीची माहिती दिली आहे. त्यांनी ई-मेल म्हटले आहे, की कंपनीच्या महसुलात घसरण झाली आहे. त्यामुळे विमान वाहतूक उद्योगाचे अस्तित्व पणाला लागले आहे. सर्व पैसे संपू नये, यासाठी पैशांकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायला हवे.

हेही वाचा-केंद्र सरकार पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क पुन्हा वाढविण्याची शक्यता

कंपनीची इच्छा नसतानाही आणि दु:खाने कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये बँड ए आणि बी यांना वगळण्यात आल्याचे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी म्हटले आहे. वेतनात कपात केल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांसाठी अवघड स्थिती असणार आहे, हे माहित असल्याचेही त्यांनी ई-मेलमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा-कोरोनाचा फटका... तब्बल ३.८ कोटी भारतीयांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता

बँड ए आणि बँड बी या श्रेणीत सर्वात कमी वेतनावर कर्मचारी काम करतात, अशा कर्मचाऱ्यांची कंपनीमध्ये संख्या सर्वाधिक आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.