नवी दिल्ली - ऑनलाइन पेमेंट अॅप पेटीएम गुगल प्ले स्टोअरवरून काढून टाकण्यात आले आहे. वन 97 कम्युनिकेशन्स लिमिटेडच्या मालकीचे हे अॅप आहे. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे अॅप गुगल प्ले स्टोअरवरून काढल्याचे गुगलने म्हटलं आहे. तसेच खेळांमध्ये जुगारांना प्रोत्साहन देणाऱ्या कोणत्याच अॅपचे गुगल समर्थन करत नाही. अशा सर्वंच अॅप्सना गुगल प्ले स्टोअरवरून काढून टाकण्यात येईल, असे गुगलने म्हटलं आहे.
ऑनलाईन गेमिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या 'पेटीएम फर्स्ट गेम्स'ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका माहितीनुसार मागील एका महिन्यापासून वापरकर्त्यांच्या संख्येत प्रमाणात वाढ झाली आहे. कोरोना विषाणूच्या लॉकडाऊनच्या प्रभावामुळे या गेमिंग कंपनीच्या वापरकर्त्यांच्या संख्येत तब्बल 200 टक्क्यांनी वाढ झाली. पेटीएम फर्स्ट गेम्सने आत्तापर्यंत शेकडो विविध गेम ग्राहकांसाठी आणल्या आहेत. यामध्ये रमी, लुडो, तीन पत्ती, फँटसी क्रिकेट आणि इतर काही गेमचा समावेश होतो. या सर्व गेम्समध्ये प्रामुख्याने रमी खेळणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठी आहे.
ऑनलाईन गेम खेळणाऱ्या लोकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ऑनलाइन गेम खेळणाऱ्यांमध्ये 18 ते 45 या वयोगटातील लोकसंख्येचा प्रामुख्याने समावेश दिसत आहे. भारतामध्ये आयपीएल सुरू होण्याच्यापूर्वी जुगारासंबधित अॅप लाँच होतात.
हेही वाचा - ...म्हणून समाज माध्यमांवर गुप्तचर संस्था ठेवतात लक्ष