ETV Bharat / business

लोकसभा निवडणूक : इंधनाच्या मागणीत फेब्रुवारीत ३. ८ टक्क्यांची वाढ

येत्या दोन महिन्यात निवडणुकीचा प्रचार आणि मतदान प्रक्रिया पार पाडणार आहे. या कालावधीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांचे नेते व कार्यकर्त्यांकडून वाहतुकीचे प्रमाण वाढणार आहे.

प्रतिकात्मक
author img

By

Published : Mar 19, 2019, 8:45 PM IST

नवी दिल्ली - देशात तेलइंधनाच्या मागणीत फेब्रुवारीत ३.८ टक्क्यांची वाढ झाली आहे. मोफत स्वयंपाकाच्या गॅस जोडणी दिल्याने व पेट्रोल-डिझेलची मागणी वाढल्याने इंधनाची मागणी वाढली आहे. निवडणुकीच्या तोंडावर वाहतुकीचे प्रमाण वाढल्याने पेट्रोल-डिझेलचा आणखी वापर वाढणार आहे.

फेब्रुवारीत १७.४१ मिलियन टन तेलइंधन खर्ची झाले आहे. गतवर्षी फेब्रुवारीत १६.७७ मिलियन टन तेलइंधन खर्ची झाले होते. ही आकडेवारी तेलमंत्रालयाच्या पेट्रोलियम नियोजन आणि विश्लेषण विभागाने (पीपीएसी) दिली आहे. सलग तीन महिने इंधनाची देशात मागणी वाढली आहे. पेट्रोलची ८ टक्के मागणी वाढली आहे. केंद्र सरकारने प्रत्येक घरात गॅस जोडणी देण्यासाठी योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. याचा परिणाम म्हणून स्वयंपाकाच्या गॅसची १४.२ टक्के मागणी वाढली आहे. डिझेलची इंधन म्हणून देशात सर्वात अधिक मागणी असते. फेब्रुवारीत डिझेलच्या मागणीत २.७ टक्के वाढ झाली आहे.

येत्या दोन महिन्यात निवडणुकीचा प्रचार आणि मतदान प्रक्रिया पार पाडणार आहे. या कालावधीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांचे नेते व कार्यकर्त्यांकडून वाहतुकीचे प्रमाण वाढणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान हे ११ एप्रिलपासून पार पडणार आहे.फेब्रुवारीत हवाई तेल इंधनाच्या मागणीतही १०.५ टक्के वाढ झाली आहे. केंद्र सरकारने स्वच्छ उर्जेला प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले आहे. गतवर्षीच्या तुलनेत रॉकेलचा वापर १२ टक्क्याने घसरला आहे.

Intro:Body:

India's fuel demand rises 3.8 pc in Feb

   PPAC,Oil Ministry ,LPG consumption ,fuel demand, तेलइंधन, loksabha election, ATF,लोकसभा निवडणूक,

लोकसभा निवडणूक : इंधनाच्या मागणीत फेब्रुवारीत ३. ८ टक्क्यांची वाढ

नवी दिल्ली - देशात तेलइंधनाच्या मागणीत फेब्रुवारीत ३.८ टक्क्यांची वाढ झाली आहे. मोफत स्वयंपाकाच्या गॅस जोडणी दिल्याने व पेट्रोल-डिझेलची मागणी वाढल्याने इंधनाची मागणी वाढली आहे. निवडणुकीच्या तोंडावर वाहतुकीचे प्रमाण वाढल्याने पेट्रोल-डिझेलचा आणखी वापर वाढणार आहे.

फेब्रुवारीत १७.४१ मिलियन टन तेलइंधन खर्ची झाले आहे. गतवर्षी फेब्रुवारीत १६.७७ मिलियन टन तेलइंधन खर्ची झाले होते. ही आकडेवारी तेलमंत्रालयाच्या पेट्रोलियम नियोजन आणि विश्लेषण विभागाने (पीपीएसी) दिली आहे.  

सलग तीन महिने इंधनाची  देशात मागणी वाढली आहे. पेट्रोलची ८ टक्के मागणी वाढली आहे. केंद्र सरकारने प्रत्येक घरात गॅस जोडणी देण्यासाठी योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. याचा परिणाम म्हणून  स्वयंपाकाच्या गॅसची १४.२ टक्के मागणी वाढली आहे. डिझेलची इंधन म्हणून देशात सर्वात अधिक मागणी असते. फेब्रुवारीत डिझेलच्या मागणीत २.७ टक्के वाढ झाली आहे.

येत्या दोन महिन्यात निवडणुकीचा प्रचार आणि मतदान प्रक्रिया पार पाडणार आहे. या कालावधीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांचे नेते व कार्यकर्त्यांकडून वाहतुकीचे प्रमाण वाढणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान हे ११ एप्रिलपासून पार पडणार आहे.

फेब्रुवारीत हवाई तेल इंधनाच्या मागणीतही १०.५ टक्के वाढ झाली आहे. केंद्र सरकारने स्वच्छ उर्जेला प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले आहे. गतवर्षीच्या तुलनेत रॉकेलचा वापर १२ टक्क्याने घसरला आहे.  

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.