नवी दिल्ली - भारतीय रेल्वेचे कधीही खासगीकरण करण्यात येणार नाही. मात्र, रेल्वेचे काम अधिक कार्यक्षमपणे चालविण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी संसदेमध्ये स्पष्ट केले.
रेल्वेसाठी करण्यात आलेल्या मागण्यांबाबत संसदेमध्ये चर्चा सुरू असताना केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, गेल्या दोन वर्षात रेल्वे अपघातामुळे एकाही प्रवाशाचा मृत्यू झाला नाही. रेल्वेकडून प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आलेले आहेत.
हेही वाचा-पेट्रोल-डिझेलवरील करात कपात करण्यावर विचार करण्यास केंद्र सरकार तयार
भारतीय रेल्वे ही प्रत्येक भारतीयाची मालमत्ता-
खासगी आणि सार्वजनिक क्षेत्र एकत्रित आल्याने देशाची आणखी प्रगती होण्याच्या दृष्टीने वाटचाल होऊ शकते. तसेच अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. भारतीय रेल्वेचे कधीही खासगीकरण होणार नाही. ही प्रत्येक भारतीयाची मालमत्ता आहे व राहणार आहे. भारतीय रेल्वे ही भारत सरकारकडेच राहणार आहे.
हेही वाचा-'कर्ज वसुली करणाऱ्या एजंटच्या बेकायदेशीर वर्तणुकीला बँका ठरणार जबाबदार'
मोदी सरकारच्या काळात रेल्वेमध्ये गुंतवणुकीत वाढ-
मोदी सरकारच्या काळात रेल्वेमध्ये आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये २.१५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. तर आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये १.५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती. प्रवाशांच्या सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करत असल्याचेही केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी यावेळी सांगितले.