नवी दिल्ली - भारत आणि अमेरिकेने संरक्षण सहकार्याचा विस्तार केल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. नवी दिल्लीने (भारत सरकारने) ३ अब्ज डॉलरहून अधिक किमतीचे अमेरिकेची अद्ययावत अॅपाचे आणि एमएच-६० रोमिओ हेलिकॉप्टर्स खरेदी करण्याची तयारी दाखविल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमेवतच्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
संरक्षण करार केल्याने दोन्ही देशांमधील संयुक्त संरक्षणाची क्षमता वाढणार असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. ट्रम्प हे भारतात येण्यापूर्वी संरक्षणावरील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या समितीने चॉपर्स, पाणबुडी खरेदी करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली होती.
हेही वाचा-भारतीय उद्योगांनी अमेरिकेत विस्तार करावा; डोनाल्ड ट्रम्प यांची अपेक्षा
अमेरिकेने फॉरेन मिलिट्री सेल्स (एफएमएस) कार्यक्रमांतर्गत चॉपरच्या विक्रीला गतवर्षी एप्रिलमध्ये मंजुरी दिली आहे.