नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटकाळात भारतीय पोस्टाने जनतेसाठी मोलाची मदत केली आहे. पोस्ट विभागाने टाळेबंदीत २ हजार टनाहून अधिक औषधे व साधनांची डिलिव्हरी रुग्णालय व जनतेपर्यंत पोहोचविली आहे.
आधारशी जोडलेल्या देयक व्यवस्थेमधून भारतीय पोस्ट विभागाने सुमारे १ हजार ५०० कोटी रुपये ८५ लाख लाभार्थ्यांना दिले आहेत. तर इलेक्ट्रॉनिक मनी ऑर्डरमधून ७५० कोटी रुपये जनतेपर्यंत पोहोचविले आहेत.
हेही वाचा-जिओच्या हिश्श्याची पाचव्यांदा मोठी खरेदी; केकेआरकडून ११,३६७ कोटींची गुंतवणूक
केंद्रीय दूरसंचार मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी चिफ पोस्ट मास्टर्स जनरल आणि भारतीय पोस्ट विभागाच्या वरिष्ठांना शुक्रवारी सूचना दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिजनप्रमाणे आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी काम करावे, असे प्रसाद यांनी या अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.
हेही वाचा-लाल चिखल! टोमॅटोचे दिल्लीसह प्रमुख महानगरात कोसळले दर
भारतीय पोस्ट विभागाने ६ लाख अन्न आणि रेशनचे पॅकेट हे स्थलांतरितांना आणि मनपाच्या कर्मचाऱ्यांना वितरित केले आहेत. त्यासाठी पोस्ट विभागाने सेवाभावी संस्थांची मदत घेतली आहे.
दरम्यान, देशात २५ मार्चपासून टाळेबंदी असल्याने नागरिकांना घराबाहेर पडण्यावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.