नवी दिल्ली - देशात दोन महिन्यापूर्वी एकाही वैयक्तिक संरक्षण साधनाचे (पीपीई) उत्पादन होत नव्हते. सध्या, भारताने पीपीई उत्पादनात जगात दुसरा क्रमांक मिळविला आहे. तर पीपीई उत्पादनात चीन हा पहिल्या क्रमांकावर आहे.
कोरोनाच्या महामारीमध्ये पीपीई हे शरीराला असलेले पूर्ण आवरण डॉक्टर, परिचारिका तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी खूप उपयुक्त ठरत आहे. देशात पीपीईचे उत्पादन होत नसल्याने केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने पीपीईची गुणवत्ता आणि उत्पादनाचे प्रमाण वाढविण्यासाठी विविध प्रयत्न केले आहेत.
हेही वाचा-टाळेबंदीतही अॅमेझॉन इंडिया देणार ५० हजार नोकऱ्या; 'हे' आहे कारण
वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून केवळ मान्यताप्राप्त पीपीई उत्पादकांना सरकारला पुरवठा करण्यात येतो. याविषयी वस्त्रोद्योग मंत्रालयाचे सचिव अजित चव्हाण यांनी सांगितले, की देशात पीपीईचे उत्पादन होत नसल्याने अनेक आव्हानांचा सामना करावा लागला आहे. संधीचा फायदा घेण्यासाठी चीनमधील कंपन्यांकडून पीपीईचे दर वाढविण्यात येत होते. तसेच आयात करण्यात येणाऱ्या पीपीईसाठी वेळ लागत होता. त्यामुळे स्वदेशी पीपीईचे उत्पादन घेण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा-दिलासादायक! रेल्वे तिकिटाचे आरक्षण सर्वांसाठी ऑनलाईनसह ऑफलाईन खुले