ETV Bharat / business

व्हॉट्सअपने गोपनीयतेचे धोरण मागे घ्यावे; केंद्राची कंपनीला सूचना - WhatsApp privacy policy controversy

व्हॉट्सअपच्या प्रस्तावित गोपनीयतेचे धोरण आणि अटी वापरकर्त्याला मान्य नसेल तर सेवा बंद करण्याचा पर्याय दिला आहे. त्यामुळे मोठी चिंता वाढल्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने म्हटले आहे.

व्हॉट्सअप
व्हॉट्सअप
author img

By

Published : Jan 19, 2021, 4:05 PM IST

Updated : Jan 19, 2021, 4:14 PM IST

नवी दिल्ली - गोपनीयतेचे धोरण बदलल्यामुळे टीकेची धनी झालेल्या व्हॉट्सअपवर भारत सरकारनेही दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. व्हॉट्सअॅपने गोपनीयतेचे धोरण मागे घ्यावे, अशी सूचना भारत सरकारने व्हॉट्सअप कंपनीला केली आहे.

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान कंपनीने व्हॉट्सअपचे सीईओ विल कॅथकार्ट यांना पत्र लिहून गोपनीयतचे धोरण मागे घेण्याची सूचना केली आहे. या पत्रात मंत्रालयाने म्हटले की, भारतात व्हॉट्सअपचे सर्वाधिक वापरकर्ते आहेत. तसेच कंपनीला सेवेसाठी भारत सर्वात मोठी बाजारपेठ आहे.

व्हॉट्सअपच्या प्रस्तावित गोपनीयतेचे धोरण आणि अटी वापरकर्त्याला मान्य नसेल तर सेवा बंद करण्याचा पर्याय दिला आहे. त्यामुळे मोठी चिंता वाढल्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने म्हटले आहे.

संबंधित बातमी वाचा-व्हॉट्सअपने अटींसह बदलल्या गोपनीयतेच्या अटी

काय म्हटले आहे भारत सरकारने?

  • माहितीची गोपनीयता, निवडीचे स्वातंत्र्य आणि डाटा सुरक्षा याबाबत कंपनीने पुनर्विचार करावा, असेही मंत्रालयाने म्हटले आहे.
  • भारतीयांचा पूर्णपणे आदर करावा.
  • कोणतेही एकांगी बदल आणि अटी योग्य नाही. तसेच ते अस्वीकारार्ह आहेत.
  • देशात व्हॉट्सअपचे ४०० दशलक्ष वापरकर्ते आहेत. कंपनीने धोरणात बदल केल्याने देशातील नागरिकांवर चुकीचा परिणाम होणार आहे.
  • डाटा, माहिती सुरक्षा, गोपनीयता, इनक्रिप्शन तसेच दुसऱ्या अ‌ॅपमध्ये डाटा शेअर करण्याबाबत सविस्तर माहितीही सरकारने व्हॉट्सअपकडून मागविली आहे.

संबंधित बातमी वाचा-व्हॉट्सअ‌ॅप बॅकफूटवर, प्रायव्हसी अपडेटचा निर्णय पुढं ढकलला

गोपनीयतेचे धोरण बदलण्याचा निर्णय पुढे ढकलला-

प्रायव्हसी म्हणजेच युजरच्या गोपनीयतेसंदर्भातील अपडेट पुढे ढकलत असल्याची घोषणा व्हॉट्सअ‌ॅपने केली आहे. व्हॉट्सअ‌ॅपच्या नव्या पॉलिसीमुळे वापरकर्त्यांमध्ये माहितीबाबत असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झाले होते. युजरची माहिती सार्वजनिक करण्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, आता कंपनीने एक पाऊल मागे घेत मोठा निर्णय घेतला. अपडेट पुढे ढकलत असल्याने ग्राहकांना नव्या धोरणाचा आढावा घेण्यासाठी आणि नियमावली स्वीकारण्यास वेळ मिळेल, असे कंपनीने म्हटले आहे. लोकांमध्ये चुकीची माहिती पसल्यामुळे गोपनीय माहितीचा अपडेट पुढे ढकलण्यात आल्याचे व्हॉट्सअ‌ॅपने म्हटले आहे. तसेच कोणाचेही खाते बंद होणार नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

व्हॉट्सअपचे असे आहे नवे धोरण-

व्हाट्सअपकडून डाटावर कशी प्रक्रिया केली जाते. डाटा कसा स्टोअर केला जातो, आदी बाबीबाबत धोरण बदलण्यात येत आहे. हे अपडेट ८ फेब्रुवारीपासून लागू होणार होते. फेसबुकच्या अटी मान्य केल्यानंतर हे अपडेट होणार आहे.

तुमचा डाटा सुरक्षित नाही-

सायबर सेक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडियाचे महासंचालक कर्नल इंद्रजि सिंह म्हणाले की, नव्या धोरणानुसार तुम्ही जे काही व्हॉट्सअपवर शेअर करणार आहात, ते गोपनीय राहणार नाही. यामध्ये तुमचे चॅट, ग्रुप चॅट, कॉन्टॅक्ट डीपी, पेमेंटची माहिती आदींचा समावेश आहे. जरी व्हॉट्सअपकडून इन्ड टू इन्ड एनक्रिप्शनचा दावा केला जात असला तरी तुमचा डाटा सुरक्षित नाही.

Last Updated : Jan 19, 2021, 4:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.