ETV Bharat / business

आयटीआर भरण्याचा आज शेवटचा दिवस; मुदतवाढ दिल्याची 'ती' अफवा असल्याचे प्राप्तिकर विभागाचे स्पष्टीकरण - Income tax updated news

प्राप्तिकर विभागाकडून विवरणपत्र (आयटीआर) भरण्याला मुदतवाढ देण्यात आल्याचे पत्र सोशल मीडियावर पसरत आहे. ते अधिसूचनेचे पत्र नसून अफवा असल्याचे प्राप्तिकर विभागाने स्पष्ट केले आहे.

प्रतिकात्मक - आयटीआर
author img

By

Published : Aug 30, 2019, 3:01 PM IST

Updated : Aug 31, 2019, 12:06 PM IST

नवी दिल्ली - प्राप्तिकर विवरणपत्र (आयटीआर) भरण्याची आज शेवटची तारीख आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) आयटीआर भरण्याची ३१ ऑगस्ट हे शेवटची मुदत दिली आहे. मुदतवाढ दिल्याची केवळ अफवा असल्याचे प्राप्तिकर विभागाने स्पष्ट केले आहे.

प्राप्तिकरदात्यांनी ३१ ऑगस्टनंतर विवरण पत्र भरल्यास त्यांना ५ हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.

प्राप्तिकर विभागाकडून विवरणपत्र (आयटीआर) भरण्याला मुदतवाढ देण्यात आल्याचे पत्र सोशल मीडियावर पसरत आहे. ते अधिसूचनेचे पत्र नसून अफवा असल्याचे प्राप्तिकर विभागाने स्पष्ट केले आहे.

  • It has come to the notice of CBDT that an order is being circulated on social media pertaining to extension of due dt for filing of IT Returns. It is categorically stated that the said order is not genuine.Taxpayers are advised to file Returns within extended due dt of 31.08.2019 pic.twitter.com/m7bhrD8wMy

    — Income Tax India (@IncomeTaxIndia) August 30, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

प्राप्तिकर विभागाकडे आयटी रिटर्न भरणे वेळेत बंधनकारक असते. अन्यथा करदात्याला दंड भरावा लागतो. यापूर्वी ३१ जुलै ही आयटीआर भरण्याची शेवटची मुदत होती. त्यावेळी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली होती.

दंड वाचविण्यासाठी वेळेवर भरा प्राप्तिकर विवरणपत्र-
प्राप्तिकर विभागाच्या माहितीनुसार सर्व करदात्यांना ३१ ऑगस्ट २०१९ पर्यंत प्राप्तीकर विवरण भरणे आवश्यक आहे. अन्यथा करदात्याला दंड भरावा लागणार आहे.

  • प्राप्तिकर विवरण पत्र ३१ ऑगस्ट २०१९ नंतर ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत भरल्यास ५ हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.
  • ३१ डिसेंबर २०१९ नंतर प्राप्तिकर विवरण भरणाऱ्यांना १० हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.
  • जर ३१ मार्च २०२० नंतर प्राप्तिकर विवरण भरले नाही तर प्राप्तिकर विभागाकडून नोटीस पाठविली जाणार आहे.
  • ज्यांचे उत्पन्न हे ५ लाख रुपयांहून कमी आहे, त्यांना उशीर झाल्याने केवळ १ हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.

हेही वाचा-प्राप्तिकर विवरण पत्र भरण्याची ३१ ऑगस्ट अंतिम मुदत , उशीर झाल्यास एवढा भरावा लागणार दंड

हेही वाचा- केंद्र सरकारचा भ्रष्ट प्राप्तिकर अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा; २२ जणांना सक्तीची निवृत्ती

हेही वाचा- बेनामी संपत्ती असलेल्या काँग्रेस नेत्याला प्राप्तिकर विभागाचा दणका ; दिल्लीतील हॉटेलवर जप्ती

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Aug 31, 2019, 12:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.