ETV Bharat / business

शनिवार-रविवार असूनही प्राप्तिकर-जीएसटीची कार्यालये सुरू राहणार

मार्चअखेर असल्याने भारतीय रिझर्व्ह बँकेनेही ३० व ३१ मार्चला बँका सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

प्राप्तीकर कार्यालय
author img

By

Published : Mar 30, 2019, 3:28 PM IST

नवी दिल्ली - आर्थिक वर्ष संपत असताना ३१ मार्चला रविवार आहे. करदात्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्राप्तीकर आणि जीएसटी कार्यालये रविवारी व शनिवारी सुरू राहणार आहेत.

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि उत्पादन शुल्क कार्यालयाने (सीबीआयसी) सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना कार्यालये सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. करदात्यांना मदत व्हावी म्हणून सप्ताह अखेर असतानाही ३० व ३१ मार्चला कार्यालये सुरू ठेवावीत, असे सीबीआयसीने म्हटले आहे.

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) क्षेत्रीय अधिकाऱ्यांना ३० व ३१ मार्चला अतिरिक्त काउंटर सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. आर्थिक वर्ष २०१८ -२०१९ हे ३१ मार्चला संपत आहे. अशा स्थितीत देशातील सर्व प्राप्ती कार्यालये सुरू राहणार असल्याचे सीबीडीटीने म्हटले आहे.

महसुलीचे उद्दिष्ट अपूर्ण
केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षात ११.४७ कोटींचे जीएसटी महसुलाचे उद्दिष्ट ठेवले आहे.फेब्रुवारीपर्यंत जीएसटी महसुलाचे उद्दिष्ट हे १०.७० लाख कोटी एवढे पूर्ण झाले आहे. २३ मार्चपर्यंत प्रत्यक्ष करातून सीबीडीटीला १०.२१ लाख कोटी रुपये मिळाले आहेत. हे एकूण उद्दिष्ट असलेल्या १२ लाख कोटींच्या ८५.१ टक्के एवढे आहे. हे उद्दिष्ट अधिकाधिक पूर्ण करण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना सीबीडीटीने अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.मार्चअखेर असल्याने भारतीय रिझर्व्ह बँकेनेही ३० व ३१ मार्चला बँका सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Intro:Body:

India again extends deadline to impose high import duties on 29 US products till May 2

US products, उत्पादन शुल्क, almond,customs duties ,GSP,GSP programme,IT products, market access,

अमेरिकेतील उत्पादनांवर आयात शुल्क वाढीच्या मुदतीत भारताकडून २ मेपर्यंत वाढ

नवी दिल्ली -  अमेरिकेमधून देशात आयात करण्यात येणाऱ्या उत्पादनांवरील शुल्कात लागू करण्याची मुदत केंद्र सरकारने पुन्हा वाढविली आहे. ही मुदत २ मेपर्यंत वाढविली आहे. यामध्ये बदाम आणि दाळींसह २९ उत्पादनांचा समावेश आहे. याबाबतची अधिसूचना केंद्रीय अर्थमंत्रालयाने काढली आहे.

केंद्र सरकारकडून अमेरिकेतील उत्पादनांवर १ एप्रिल २०१८ ला आयात शुल्क वाढविण्यात येणार होते. केंद्र सरकारने जून २०१८ पासून अमेरिकेतील उत्पादनांवर आयात शुल्क लागू करण्याचा निर्णय सहाहून अधिक वेळा पुढे ढकलला आहे. मार्चच्या सुरुवातीला अमेरिकेने प्राधान्याने देण्यात येणाऱ्या व्यवस्थेतून (जीएसपी) भारताच्या १ हजार ९०० वस्तुंना वगळण्याचा निर्णय घेतला. याबाबत चर्चा करून तोडगा काढण्यासाठी सरकारचे प्रतिनिधी पुढील महिन्यात अमेरिकेत जाणार आहे.

अमेरिकेने भारतावरील अॅल्युमिनियम आणि स्टीलवर लावलेले उच्च शुल्क कमी करावे, अशी भारताची मागणी आहे.  तर  कृषी उत्पादने, दूग्धजन्य उत्पादने आणि वैद्यकीय उपकरणांसाठी भारतीय बाजारपेठ अधिक खुली व्हावी, अशी अमेरिकेने भारताकडे मागणी केली आहे. भारताने २०१७-२०१८ मध्ये सुमारे 4 हजार ७०० कोटी डॉलरच्या उत्पादनांची अमेरिकेत निर्यात केली आहे. तर २ हजार ६०० कोटींच्या उत्पादनांची आयात केली आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.