ETV Bharat / business

देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका; २०२० मध्ये १.९ टक्के विकासदर - आयएमएफचा अंदाज

भारताने आर्थिक उदारीकरणाचे धोरण १९९१ ला स्वीकारल्यानंतर प्रथमच सर्वात कमी अशा विकासदर राहण्याची शक्यता आहे. नुकतेच आयएमएफने जाहीर केलेल्या जागतिक आर्थिक अहवालात भारत हा सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेली अर्थव्यवस्था असल्याचे म्हटले होते.

आयएमएफ
आयएमएफ
author img

By

Published : Apr 15, 2020, 9:43 AM IST

वॉशिंग्टन - कोरोना महामारीने भारताच्या विकासदराला मोठा फटका बसणार आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) वर्ष २०२० मध्ये राष्ट्रीय सकल उत्पन्नाचा (जीडीपी) दर १.९ टक्के राहिल, असा अंदाज केला आहे. कोरोनाच्या महामारीमुळे जागतिक अर्थव्यवस्था ही १९३० नंतर सर्वाधिक निराशाजनक स्थितीला सामोरे जात आहे.

भारताने आर्थिक उदारीकरणाचे धोरण १९९१ ला स्वीकारल्यानंतर प्रथमच सर्वात कमी अशा विकासदर राहण्याची शक्यता आहे. नुकतेच आयएमएफने जाहीर केलेल्या जागतिक आर्थिक अहवालात भारत हा सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेली अर्थव्यवस्था असल्याचे म्हटले होते.

हेही वाचा-'कोविड-19' दरम्यान भारताच्या बेरोजगारीत वाढ..

चीनचा वर्ष २०२० मध्ये १.२ टक्के आर्थिक विकासदर असेल, असा अंदाज आयएमएफने व्यक्त केला आहे. आयएमएफच्या मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ म्हणाल्या की, वर्ष २०२० मध्ये जागतिक विकासदर हा ३ टक्क्यांनी घसरणार आहे. यापूर्वी जानेवारी २०२० मध्ये आयएमएफने जागतिक विकासदर हा ६.३ टक्के राहिल, असा अंदाज व्यक्त केला होता. कोरोना महामारीचा जगातील सर्व प्रदेशात परिणाम होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा-कोरोना अन् कोसळणाऱ्या अर्थव्यवस्था

वर्ष २०२१ मध्ये भारताचा विकासदर हा ७.४ टक्के राहणार आहे. तर चीनचा विकासदर हा ९.२ टक्के राहणार आहे. तर अमेरिकेचा विकासदर हा ४.५ टक्के तर जपानचा विकासदर हा ३ टक्के राहणार आहे. यापूर्वी आयएमएफने भारताचा आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये विकासदर हा ४.८ टक्के राहिल, असा अंदाज व्यक्त केला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.