ETV Bharat / business

आयएल अँड एफएसच्या लेखा परीक्षण कंपन्यांवर होणार कारवाई, एनसीएलटीचा सरकारला हिरवा कंदील - आयएल अँड एफएस

एनसीएलटीच्या निकालानंतर लेखापरीक्षण करणाऱ्या कंपन्यांना आयएल अँड एफएस ग्रुपमधील कंपन्यांचे लेखापरीक्षण करता येणार नाही. लेखापरीक्षण करणाऱ्या विदेशी कंपन्यांना हा दुसरा धक्का आहे

संग्रहित - डेलाईट
author img

By

Published : Aug 10, 2019, 5:41 PM IST

मुंबई - आयए अँड एफसचे लेखापरीक्षण करणाऱ्या डेलाईट आणि बीएसआर कंपन्यांना राष्ट्रीय कंपनी कायदे लवादाने (एनएलसीटी) मोठा दणका दिला आहे. या लेखा परीक्षण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्यासाठी एनएलसीटीने केंद्र सरकारला हिरवा कंदील दिला आहे. लेखापरीक्षण करणाऱ्या कंपन्यांनी सरकारविरोधात एनएलसीटीमध्ये दाद मागितली होती.

एनसीएलटीच्या निकालानंतर लेखापरीक्षण करणाऱ्या कंपन्यांना आयएल अँड एफएस ग्रुपमधील कंपन्यांचे लेखापरीक्षण करता येणार नाही. लेखापरीक्षण करणाऱ्या विदेशी कंपन्यांना हा दुसरा धक्का आहे. यापूर्वी एनसीएलटीने कंपनी व्यवहार मंत्रालयाला डेलाईटसह इतर २१ जणांवर कायदेशीर कारवाई करण्याची परवानगी दिली होती. डेलाईट हास्किन्स अँड सेल्स ही जगातील चार बड्या लेखापरीक्षण करणाऱ्या कंपन्यांपैकी आहे.

आयएल अँड एफ ग्रुपने ९५ हजार कोटींहून अधिक कर्ज थकविले आहे. त्यानंतर डेलाईटने आयएल अँड एफएस ग्रुपचे लेखापरीक्षण थांबविले आहे.

Intro:Body:

business

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.