नवी दिल्ली - केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी पुन्हा एकदा ट्विटरला भारतीय कायद्याची आठवण करून दिली आहे. ट्विटरने कॉपीराईट कायद्याचा वापर करून अकाउंट ब्लॉक केले होते. तेव्हा त्यांना भारतीय कायद्याचे ज्ञान अवगत असायला हवे, असा टोला केंद्रीय मंत्र्यांनी ट्विटरला लगावला आहे.
केंद्रीय रवीशंकर प्रसाद म्हणाले, की भारतामध्ये सोशल मीडिया कंपनी कंपनी व्यवसाय सुरू करतात. मात्र, त्यांनी भारतीय कायदा व संविधानाचे पालन करण्याची गरज आहे. लोकशाहीला चुकीच्या माहिती, खोट्या बातम्या, भेसळीच्या साहित्य अशा आव्हानांमध्ये टिकायला हवे. मी सेन्सॉर करण्याच्या बाजूने नाही. मात्र, लोकशाहीत अशा प्रश्नांबाबत उपाय शोधायला हवा.
केंद्रीय मंत्र्यांचे ट्विटर अकाउंट बंद झाले होते!
केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद यांना २५ जूनला ट्विटरचे तासभर अकाउंट लॉग इन करता आले नाही. त्यानंतर पुन्हा अकाउंट लॉग इन केल्यानंतर ट्विटरविरोधात एकामागून एक ट्विट केले आहेत. ट्विटरकडून नवीन डिजीटल मीडियाच्या कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते. अमेरिकेच्या कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन झाल्याने रवीशंकर प्रसाद यांचे अकाउंट काही काळ बंद झाल्याचा दावा करण्यात आला होता.
हेही वाचा-मास्क घालण्यात मुले प्रौढांपेक्षाही आघाडीवर? वाचा....
केंद्रीय मंत्र्यांचा ट्विटरला गर्भित इशारा-
मोठ्या तंत्रज्ञान कंपन्या चांगला पैसे कमवातितात. चांगला नफा कमवितात. मात्र, जबाबदारही राहतात. हे फक्त जर तुम्ही देशातील नियमांचे पालन केले तर शक्य होईल, असा गर्भित इशाराही केंद्रीय मंत्र्यांनी ट्विटरला दिला आहे.
हेही वाचा-सहमतीने संबंध ठेवल्याच्या फेसबुकवरील पुराव्याने बलात्काराच्या आरोपीला जामिन
ट्विटर व सरकारमध्ये सतत मतभेद
सोशल मीडियाच्या नवीन नियमाप्रमाणे ट्विटरने मुख्य अंमलबजावणी अधिकाऱ्याची सविस्तर माहिती दिली नव्हती. केंद्र सरकारने तंबी दिल्यानंतर ट्विटरने वकिलाची माहिती ही नोडल संपर्क व्यक्ती आणि तक्रार निवारण अधिकारी म्हणून पाठविली होती. त्यानंतर ट्विटरने नेमलेल्या अधिकाऱ्यानेही नोकरीचा राजीनामा दिला आहे. सोशल मीडियाच्या नव्या कायद्याला ट्विटर जुमानत नसल्याचा आरोप केंद्रीय माहिती रवीशंकर यांनी वारंवार केला आहे.