ETV Bharat / business

'ही' कार मिळणार १. ५८ लाख रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या अधिक माहिती - स्वस्त कार

हुदांईच्या कॉना मॉडेलची किंमत १.५८ लाख रुपयाने स्वस्त होणार आहे. त्यामुळे  ग्राहकाला २५.३ लाख रुपयांऐवजी २३.७१ लाख रुपये द्यावे लागणार आहेत.  बदलण्यात आलेले दर हे १ ऑगस्ट, २०१९ पासून लागू होणार असल्याचे हुंदाई कंपनीने म्हटले आहे.

हुदांई कॉना मॉडेल
author img

By

Published : Aug 2, 2019, 6:19 PM IST

नवी दिल्ली - इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याची ग्राहकांना वरचेवर चांगली संधी मिळत आहे. हुंदाई मोटरने इलेक्ट्रिक कार कॉनाची किंमत सुमारे १.५८ लाख रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारने जीएसटी दर कमी केल्याचा फायदा थेट ग्राहकांना मिळवून देण्यासाठी हुंदाईने हा निर्णय घेतला आहे.

हुदांईच्या कॉना मॉडेलची किंमत १.५८ लाख रुपयाने स्वस्त होणार आहे. त्यामुळे ग्राहकाला २५.३ लाख रुपयांऐवजी २३.७१ लाख रुपये द्यावे लागणार आहेत. बदलण्यात आलेले दर हे १ ऑगस्ट, २०१९ पासून लागू होणार असल्याचे हुंदाई कंपनीने म्हटले आहे. कंपनीने देशातील ११ शहरात १५ वितरक नेमले आहेत. यामधून ग्राहकांनी १५२ कॉनासाठी नोंदणी केली आहे.

टाटा मोटर्सने इलेक्ट्रिक कार टिगोरची किंमत ८० हजार रुपयांनी कमी केल्याचे गुरुवारी जाहीर केले होते.

जीएसटी परिषेदेने इलेक्ट्रिक कारसह चार्जरवरील दर केले आहेत कमी-

गेल्या आठवड्यात जीएसटी परिषदेने इलेक्ट्रिक कारवरील कर हा १२ टक्क्यावरून ५ टक्के करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची १ ऑगस्टपासून अंमलबजावणी करण्यात येत आहे. जीएसटी परिषदेने इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जवरील कर हा १८ टक्क्यावरून थेट ५ टक्के एवढा कमी केला आहे.

या आहेत कारमध्ये सुविधा-
संपूर्ण इलेक्ट्रिक असलेली एसयूव्ही कॉना एकाच चार्जिंगमध्ये ४५२ किमी धावते, असा कंपनीचा दावा आहे. कारमध्ये सहा एअरबॅग्ज, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टिम्स आणि टाय प्रेशर मॉनिरटिंग सिस्टिम आणि मार्गदर्शक सूचनांसह रिअर कॅमेराची सुविधा आहे

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.