हैदराबाद - तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज हैदराबाद-सिकंदराबादला जोडणाऱ्या मेट्रो रेल्वेची सेवा लाँच केली. ही मेट्रो ज्युबिली बस स्थानक ते महात्मा गांधी बस स्थानकाच्या मेट्रोस्टेशनपर्यंत धावणार आहे. हैदराबाद आणि सिकंदराबाद ही दोन जुळी शहरे आहेत.
हैदराबाद मेट्रोच्या ११ किमीच्या नव्या मेट्रोमार्गाचे शुक्रवारी लाँचिंग करण्यात आले आहे. हैदराबाद मेट्रो रेल ही दिल्लीनंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाचे रेल्वे नेटवर्क झाले आहे. हैदरबाद मेट्रोमधून रोज ४ लाख प्रवासी प्रवास करतात. तर मेट्रोच्या ७८० फेऱ्या होतात.
तर नवी दिल्ली-एनसीआरमधील मेट्रो नेटवर्क हे ३०० किमी परिसरात विस्तारलेले आहे. दिल्ली मेट्रोसाठी केवळ सरकारने पैसे खर्च केले आहेत.
हेही वाचा-पेट्रोलसह डिझेलच्या दरात मोठी कपात; जाणून घ्या आजचे दर
जगातील सर्वात मोठी पीपीपी प्रकल्प-
हैदराबादमधील मेट्रोच्या खर्चासाठी तेलंगणा सरकारने एल अँड टी कंपनीबरोबर भागीदारी केली आहे. हा प्रकल्प सुमारे २० हजार कोटी रुपयांचा आहे. हा जगातील सर्वात मोठा सार्वजनिक खासगी भागीदारी प्रकल्प आहे.
हेही वाचा-कोरोना विषाणू परिणाम : सरकारने १२ बंदरावर सतर्कतेचे दिले आदेश
हैदराबादमधील मेट्रो प्रकल्प हा सर्वात प्रतिष्ठित प्रकल्प कार्यान्वित केल्याचे लार्सन आणि टुर्बोचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक एस. एन. सुब्रमण्यन यांनी म्हटले आहे. मेट्रो रेल्वेचे काम हे अभियांत्रिकीचे आश्चर्य आहे. मेट्रो प्रकल्पासाठी एल अँड टीने सीबीटीसीसारखे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले आहे.