ETV Bharat / business

ग्राहकांचा कमी प्रतिसाद; गृहविक्रीत जुलै-सप्टेंबरमध्ये ४६ टक्क्यांची घसरण - गृहविक्री न्यूज

कोरोना महामारीचा घरविक्रीच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. हा फटका पुणे, हैदराबाद, मुंबई अशा महानगरातील बांधकाम व्यवसायांना बसला आहे.

संग्रहित
संग्रहित
author img

By

Published : Sep 30, 2020, 2:41 PM IST

नवी दिल्ली - कोरोना महामारीच्या फटक्यामधून अद्याप स्थावर मालमत्ता क्षेत्र सावरलेले नाही. देशातील सात महानगरांमध्ये जुलै ते सप्टेंबरमध्ये गृहविक्रीत ४६ टक्क्यांची घसरण झाली आहे. ही माहिती प्रॉपर्टी कन्सल्टंट एनारॉकने अहवालात दिली आहे.

गतवर्षी जुलै ते सप्टेंबरदरम्यान दिल्ली-एनसीआर, मुंबई महानगर (एमएमआर), कोलकाता, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद आणि पुण्यात एकूण ५५ हजार ८० घरांची विक्री झाली होती. यंदा जुलै ते सप्टेंबरमध्ये २९ हजार ५२० घरांची विक्री झाली आहे.

चालू वर्षात जानेवारी ते सप्टेंबरमध्ये घरांच्या विक्रीत ५७ टक्के घसरण झाली आहे. या कालावधीत ८७ हजार ४६० घरांची विक्री झाली आहे. तर गतवर्षी जानेवारी ते सप्टेंबरमध्ये २ लाख २ हजार २०० घरांची विक्री झाली होती. याबाबत बोलताना एनारॉकचे चेअरमन अनुज पुरी म्हणाले, की मागील जुलै- सप्टेंबरच्या तिमाहीत घरांची विक्री दुप्पट झाली होती.

अशी आहे चालू वर्षातील महानगरांमधील घरांची विक्री

  • एनसीआरमध्ये ५ हजार २०० घरांची जुलै-सप्टेंबरमध्ये विक्री झाली आहे. गतवर्षी हे प्रमाण ९ हजार ८३० होते.
  • एमएमआरमध्ये घरांच्या विक्रीचे प्रमाण हे १७ हजार १८० वरून ९ हजार २०० झाले आहे.
  • बंगळुरूमधील रहिवासी मालमत्तांच्या विक्रीचे प्रमाण हे जुलै ते सप्टेंबरमध्ये ५ हजार ४०० राहिले आहे. तर गतवर्षी १० हजार ५०० घरांची विक्री झाली होती.
  • पुण्यातही मागणी कमी झाल्याने रहिवासी मालमत्ता विक्रीला फटका बसला आहे. पुण्यात जुलै ते सप्टेंबरमध्ये ४ हजार ८५० रहिवासी मालमत्तेची विक्री झाली होती. या कालावधीत यंदा ८ हजार ५५० रहिवासी मालमत्तेची विक्री झाली आहे.
  • गतवर्षी जुलै ते सप्टेंबरमध्ये ३१ हजार ३८० घरांची विक्री झाली होती. यंदा पुण्यात १४ हजार २०० घरांची विक्री झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.