ETV Bharat / business

प्लास्टिकच्या कचऱ्यातून मिळणार पैसे, या राज्याने आणली अभिनव योजना

एकवेळ वापरण्यात येणारे प्लास्टिक हे कचरा गोळा करणारे, घरामधून व स्थानिक स्वराज्य संस्थांकडून हिमाचल प्रदेश खरेदी करणार आहे. त्यासाठीच्या आराखड्याला हिमाचलच्या  मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

संपादित छायाचित्र
author img

By

Published : Sep 17, 2019, 2:39 PM IST

Updated : Sep 17, 2019, 3:56 PM IST

शिमला - 'कचरा म्हटले की त्याची किंमत शून्य' हे गणित हिमाचल प्रदेशमध्ये बदलणार आहे. कारण एकवेळ वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या कचऱ्याचे प्रमाण कमी करण्यासाठी हिमाचल प्रदेशने अभिनव योजना आणली आहे. असा प्लास्टिकचा कचरा हिमाचल प्रदेश प्रति किलो ७५ रुपये दराने खरेदी करणार आहे.

एकवेळ वापरण्यात येणारे प्लास्टिक हे कचरा गोळा करणारे, घरामधून व स्थानिक स्वराज्य संस्थांकडून हिमाचल प्रदेश खरेदी करणार आहे. त्यासाठीच्या आराखड्याला हिमाचलच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

हेही वाचा-एकवेळ वापर होऊ शकणाऱ्या प्लास्टिक वापराबाबत गोंधळ!

यापूर्वीही प्लास्टिकवर बंदी घालण्याचे सरकारने घेतले आहेत निर्णय-
गेल्या वर्षी हिमाचल प्रदेशने थर्माकोल प्लेटवरच्या वापरावर पूर्णपणे बंदी घातली आहे. तसेच प्रदूषण टाळण्यासाठी १ लिटरहून कमी क्षमतेच्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बॉटलवर बंदी घातली आहे. तर २ ऑक्टोबर २००९ पासून सरकारने पॉलिथिन बॅगवर पूर्णपणे बंदी घातली आहे.

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. यामध्ये हिमाचल प्रदेश पर्यावरण धोरण २०१९ जाहीर करण्यात आले आहे. पर्यावरणावर विशेष लक्ष केंद्रित करून पर्यटनाचा विकास करण्याचा आराखडा अहवालात दिला आहे. या आराखड्यात सेंद्रिय कृषी व रोमांचकारक खेळ यांचाही समावेश आहे.

हेही वाचा-प्लास्टिक बॉटल नष्ट करून मोबाईल रिचार्ज करा; रेल्वे मंत्रालयाचा उपक्रम

हिमाचल प्रदेशने गुणवंत विद्यार्थ्यांसाठी श्रीनिवासन रामानुजन विद्यार्थी डिजीटल योजना जाहीर केली आहे. या योजनेमधून गुणवंत विद्यार्थ्यांना ९ हजार ७०० लॅपटॉप देण्यालाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

हेही वाचा-सीलबंद पाण्याच्या बाटलीसाठी प्लास्टिकला पर्याय शोधा, रामविलास पासवान यांची उत्पादकांना सूचना

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Sep 17, 2019, 3:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.