नवी दिल्ली - तुम्ही दुचाकी घेण्याचे नियोजन करणार असाल तर ही महत्त्वाची बातमी आहे. हिरो मोटोकॉर्प कंपनी मोटरसायकल आणि स्कूटरच्या किमती १ जुलैपासून वाढविणार आहे.
वाहनाच्या कच्च्या मालाच्या किमती सातत्याने वाढत असल्याने दुचाकींच्या किमती वाढल्याचे हिरो मोटोकॉर्पने म्हटले आहे. दरवाढीचा ग्राहकांवर कमीत कमी परिणाम होण्याकरिता बचत कार्यक्रम राबिण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. हिरो मोटोकॉर्पच्या दुचाकी आणि स्कूटरच्या किमती ३ हजार रुपयापर्यंत वाढणार आहेत. प्रत्यक्ष किमती या वाहनाचे मॉडेल आणि विशिष्ट बाजारावर अवलंबून असणार आहेत.
हेही वाचा-धक्कादायक! आयसीयूमधील २४ वर्षीय रुग्णाचा उंदराने कुरतडला डोळा
हिरो मोटोकॉर्पने २४ मेपासून सुरू केले उत्पादन प्रकल्प-
हिरो मोटोकॉर्पने २४ मेपासून गुरुग्राम, हरियाणामधील धारुहेरा आणि उत्तराखंडमधील हरिव्दार येथील उत्पादन प्रकल्प सुरू केले आहेत. कंपनीने देशातील सर्व सहा उत्पादन प्रकल्प चार दिवसांसाठी बंद केले होते. हे प्रकल्प २२ एप्रिल ते २ मेपर्यंत बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा १६ मे रोजीपर्यंत हे प्रकल्प बंद ठेवण्याची मुदत वाढविली होती. हिरो मोटोकॉर्प हळूहळू देशातील उत्पादनाचे कामकाज सुरू केले आहे. राजस्थानमधील नीमराना, गुजरातमधील हलोल आणि आंध्रप्रदेशमधील चित्तूर येथील प्रकल्पही २४ मेपासून सुरू केले आहेत.
हेही वाचा-शरद पवारांच्या निवासस्थानी झालेली बैठक त्यांनी बोलाविली नव्हती- माजिद मेमन