नवी दिल्ली - काँग्रेस पक्षाला १७० कोटींची एका कंपनीकडून देणगी मिळाल्याचा दावा करण्यात येत आहे. ही कंपनी ३ हजार ३०० कोटींच्या हवाला रॅकेटमध्ये सहभागी आहे. त्यामुळे प्राप्तिकर विभागाने काँग्रेसला नोटीस पाठविली आहे.
प्राप्तिकर विभागाने संबंधित कंपनीच्या दिल्ली, मुंबई आणि हैदराबादमधील विविध कार्यालयांवर ऑक्टोबरमध्ये छापे टाकले होते. याबातची पुढील चौकशी करण्यासाठी काँग्रेस पक्षाला नोटीस पाठविण्यात आल्याचे प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे. ही कंपनी पायाभूत क्षेत्रात आघाडीची कंपनी असल्याचे समजते.