भोपाळ – जीएसटीच्या गुप्तचर अधिकाऱ्यांनी 105 कोटी रुपयांची करचुकवेगिरी होणारे प्रकरण शोधून काढले आहे . इंदूरमधील सिगरेट कारखान्याच्या मालकाने ही गतवर्षी करचुकवेगिरी केली होती, असे जीएसटी गुप्तचर महासंचलनालयाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
जीएसटी (वस्तू व सेवा) गुप्तचर महासंचलनालयाच्या (डीजीजीआय) अधिकाऱ्याने सिगरेट कारखानाच्या परिसरात झडती घेतली. यावेळी छुप्या पद्धतीने मशिनरी बसविल्याचे अधिकाऱ्यांना आढळून आले. त्या ठिकाणी नोंदणी न झालेला कच्चा माल आणण्यात येत होता. त्यानंतर उत्पादन घेतले जात होते. कमी उत्पादन दाखविण्यासाठी बाहेरील मशिनसाठी जनरेटरचा वापर करण्यात येत होता. एप्रिल 2019 ते मे 2020 दरम्यान अंदाजित 105 कोटी रुपयांची करचुकवेगिरी झाल्याचे डीजीजीआय भोपाळच्या कार्यालयाने माहिती दिली.
यापूर्वीच करचुकवेगिरी करून फसवणूक झाल्याची शक्यता कार्यालयाने व्यक्त केली. दुसऱ्या एका करचुकवेगिरी प्रकरणातील मुख्य सूत्रधाराची डीजीजीआय भोपाळचे अधिकारी चौकशी करत आहेत.
संपूर्ण देशात एक कर व एक करप्रणाली म्हणून जीएसटीची (वस्तू व सेवा कर) अंमलबजावणी करण्यात येत आहे. देशात कोरोनाच्या संकटाने जीएसटीचे संकलन घटल्याने सरकारसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.