नवी दिल्ली - वित्तीय तूट वाढत असताना जीएसटीच्या करसंकलनाने काहीअंशी अर्थव्यवस्थेला दिलासा मिळाला आहे. मे महिन्यात १ लाख २८९ कोटींचा महसूल जमा झाला आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात एकूण ९४ हजार १६ कोटी रुपयांचा जीएसटी गोळा झाला होता.
जीएसटीआर-३बीचा परतावा मिळण्यासाठी ७२.४५ लाख करदात्यांनी अर्ज भरले आहे. एप्रिलमध्ये ७२.१३ लाख करदात्यांनी परतावा भरण्यासाठी अर्ज भरले होते, अशी माहिती केंद्रीय वित्त मंत्रालयाने दिली आहे. एप्रिलमध्ये १ लाख १३ हजार ८६५ कोटींचा जीएसटी जमा झाला होता. त्या तुलनेत मे महिन्यात कमी जीएसटी गोळा झाला आहे.
असे आहे एकूण जीएसटी महसुलाचे प्रमाण-
सीजीएसटी -१७,८११ कोटी
एसजीएसटी-२४,४६२ कोटी
आयजीएसटी - ४९,८९१ कोटी
सेस - ८,१२५ कोटी
तर जीएसटीची निधी म्हणून केंद्राने राज्यांना फेब्रुवारी-मार्चदरम्यान १८ हजार ९३४ कोटी रुपये दिले आहेत.