नवी दिल्ली - केंद्र सरकार ४ वेगवेगळ्या मुदत असलेले सरकारी रोखे शुक्रवारी विक्रीला आणणार आहे. त्याचे मूल्य हे सुमारे १७ हजार कोटी असणार आहे.
सरकारी रोख्यांची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या इंडिया कोअर बँकिंग सोल्यूशन (ई-कुबेर) माध्यमातून विक्री करण्यात येणार आहे. या निर्णयाने वित्तीय व्यवस्थेमधील चलनाची तरलता कमी होणार आहे. स्पर्धात्मक आणि बिगर स्पर्धात्मक लिलावाच्या बोली या ई-कुबेरमधील इलेक्ट्रॉनिक फॉरमॅटमध्ये करण्यात येणार आहे.