नवी दिल्ली - केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने सोन्याची आयात कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. विदेशातून सोन्याच्या पदकांसह नाण्यांच्या आयातीवरील कर सवलत बंद करण्यात आली आहे.
सोन्याची पदके व नाणीवर आगाऊ परवानगी (अॅडव्हान्स ऑथोरायझेशन) देण्यात येणार नाही. तसेच मशिनद्वारे तयार केलेल्या दागिन्यांना तशी परवानगी देण्यात येणार नसल्याचे विदेश व्यापारचे महासंचालकांनी (डिजीएफटी) नोटीसमध्ये म्हटले आहे.
हेही वाचा-सणाच्या मुहूर्तावर सोन्याला झळाळी; प्रति तोळा ३३० रुपयाने महाग
काय आहे आगाऊ परवानगी (अॅडव्हान्स ऑथोरायझेशन)
निर्यात करण्यासाठी लागणारा कच्चा माल काही उत्पादकांकडून आयात करण्यात येतो. अशा कच्चा मालावरील आयात शुल्क केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडून माफ करण्यात येते.
हेही वाचा-पालघर: सोन्याची चेन महिलेकडून लंपास, घटना सीसीटीव्हीत कैद
दरम्यान, नवी दिल्लीत सोन्याचा दर प्रति तोळा १२१ रुपयांनी घसरून ३८,५६४ रुपये झाला आहे. तर चांदीचा भाव प्रति किलोला ८५१ रुपयाने घसरून ४६,३८४ रुपये झाला आहे.
हेही वाचा-अहमदनगर: बैलाने घेतला सोन्याचा घास; दागिन्यासाठी गृहिनीला सासरचा धाक