नवी दिल्ली - केंद्र सरकारने सर्जिकल मास्कसह एकवेळ वापराच्या हातमोज्यांवरील निर्यात बंदी काढली आहे. याविषयी सरकारने अधिसूचना काढली आहे.
केंद्र सरकारने गेल्या महिन्यात वैयक्तिक संरक्षण पुरविणाऱ्या सर्व साधनांच्या निर्यातीवर बंदी घातली होती. यामध्ये मास्कसह इतर साधनांचा समावेश होता. चीनमध्ये सुमारे ९०० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर देशामध्ये मास्क, हातमोजे यांची मागणी वाढण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत सरकारने निर्यातीचे नियम शिथील केले आहेत.
हेही वाचा-'सरकारने लोकांऐवजी देशातील २०० कोट्यधींशाच्या हातात पैसे दिले'
एनबीआर हातमोजे वगळता केंद्र सरकारने एकवेळ वापर होवू शकणारे मास्क आणि हातमोज्यांच्या निर्यातीला परवानगी दिली आहे. असे विदेश व्यापार महासंचालनालयाने (डीजीएफटी) अधिसूचनेत म्हटले आहे. मात्र एन-९५ चे मास्क, हातमाजो आणि इतर वैयक्तिक संरक्षणाच्या साधनांच्या निर्यातीवरील बंदी कायम ठेवली आहे.
हेही वाचा-पेट्रोल-डिझेलवर जीएसटी लागू करण्याचा निर्णय राज्यांनी घेण्याची गरज
दरम्यान, कोरोना विषाणूने चीनमध्ये थैमान घातले आहे. येथे मृतांची संख्या तब्बल ८१० झाली आहे. २००३ मध्ये सार्सच्या संसर्गामुळे गेलेल्या बळींचा आकडाही आता कोरोनाने मागे टाकला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, सार्समुळे ९ महिन्यांमध्ये ७७४ बळी गेले होते. हा रोग तब्बल २६ देशांमध्ये पसरला होता.