नवी दिल्ली - येत्या हंगामात पिकाची लागवड करताना अडचणी येवू नये, म्हणून लॉकडाऊनमधून शेतकऱ्यांना, शेतमजूर व शेती मशिनरी केंद्रांना वगळण्यात आले आहे. ही माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केलेल्या निर्देशात दिलेली आहे.
लॉकडाऊनमधून खत उत्पादक आणि पॅकेजिंग युनिट, कीटकनाशक आणि बियाणे उत्पादनांना वगळण्यात आले आहे. भाजीमंडई व खत विक्री करणााऱ्या दुकानांनाही लॉकडाऊनमधून वगळण्यात आले आहे. शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळण्यासाठी एजन्सी काम करत आहेत. अशा स्थितीत कृषी उत्पन्न बाजार समित्यांनाही लॉकडाऊनमधून वगळले आहे.
हेही वाचा-लॉक डाऊन : ई-कॉमर्स कंपन्यांचे अंशत: कामकाज सुरू, डिलिव्हरी मिळायला होणार उशीर
पीक आणि शेतमाल बाजार समितीत आणण्यात शेतकऱ्यांना अडथळा येत आहे. त्या पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयाने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. येत्या काही महिन्यात रब्बी, डाळी व मका यांचे उत्पादन काही महिन्यात घेतले जाणार आहे.
हेही वाचा-ओला ग्रुपचे वाहन चालकांसह त्यांच्या कुटुंबांकरता २० कोटींचे दान!
दरम्यान, लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांची पीके शेतातच उभी असल्याचे पत्र माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिले होते. तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती बंद असल्याने नाशवंत फळे-भाजीपाला यांचे नुकसान होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले होते.