नवी दिल्ली - केंद्र सरकारने खुल्या सेल टीव्ही पॅनेलवरील आयात शुल्कात ५ टक्के कपात केली आहे. देशातील उत्पादनाला चालना मिळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आयात शुल्क कमी करण्यात आल्याने एलईडी टीव्हीच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय वित्तमंत्रालयाने खुल्या सेलवरील (१५.५६ इंच आणि त्याहून जास्त) आयात शुल्क कपात केल्याचे मंगळवारी उशिरा रात्री काढलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. या टीव्ही सेलचा वापर एलईडी आणि एलसीडीमध्ये करण्यात येतो.
हेही वाचा-Apple TV+ लाँच, ऑनलाईन स्ट्रिमिंग सर्व्हिसची स्पर्धा शिगेला
फिल्मवरील चिप, प्रिंटेड सर्किट बोर्ड असेंब्ली (पीसीबीए) आणि सेलवरील (ग्लास बोर्ड) आयात शुल्कही माफ करण्यात आले आहे. केंद्र सरकारने ३० जून २०१७ मध्ये टीव्ही पॅनेलवर ५ टक्के आयात शुल्क लागू केले आहे. या आयात शुल्काला ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स आणि अॅप्लायन्सेस मॅन्युफॅक्चुअर्स असोसिएशनने विरोध केला होता. हे आयात शुल्क माफ करावे, अशी मागणीही संघटनेने सरकारकडे केली होती.
हेही वाचा-नव्या दराच्या नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई , ट्रायचा केबल वाहिन्यासह डीटीएच कंपन्यांना इशारा