ETV Bharat / business

मुलांकरिता खास 'स्मार्ट विटल ज्यूनिअर' स्मार्टवॉच लाँच; 'ही' आहेत वैशिष्ट्ये - जीओक्यूआयआय स्मार्टवॉच

जीओक्यूआयआयचे सीईओ विशाल गोंडाल म्हणाले, की कोरोना महामारी ही विशेषत: मुलासांठी आव्हान ठरली आहे. या स्मार्टवॉचमुळे योग्य निदान झाल्याने वेळेवर उपचार करणे शक्य होणार आहे.

smartwatch f
स्मार्ट विटल ज्यूनिअर
author img

By

Published : Jun 5, 2021, 7:38 PM IST

मुंबई - जीओक्यूआयआय या कंपनीने कोरोनाच्या काळात मुलांसाठी 'स्मार्ट विटल ज्यूनीअर' हा खास फिटनेस ब्रँड लाँच केला आहे. या ब्रँडची किंमत 4,999 रुपये आहे.

नवीन स्मार्टवॉचची रचना आणि रंगीत डिस्पले हा खास मुलांना आवडेल असा तयार केला आहे. स्मार्टवॉचचा पट्टा हा मनगटावर फिट होईल असा आहे. या स्मार्टवॉचच्या मदतीने रिअल टाईममध्ये ऑक्सिजनची पातळी, ह्रदयाचे ठोके आणि तापमानाची पातळी कळू शकते.

हेही वाचा-गोंधळलेल्या सरकारचे कोरोनाचा संसर्ग रोखण्याऐवजी श्रेय घेण्यावर लक्ष - अमर्त्य सेन

ही आहेत स्मार्टवॉचची वैशिष्ट्ये

  • जीओक्यूआयआयचे सीईओ विशाल गोंडाल म्हणाले, की कोरोना महामारी ही विशेषत: मुलासांठी आव्हान ठरली आहे. या स्मार्टवॉचमुळे योग्य निदान झाल्याने वेळेवर उपचार करणे शक्य होणार आहे.
  • तसेच मुलांना आरोग्याचे ध्येय निश्चित करणे, ऑनलाईन लहान मुलांच्या डॉक्टरांकडून तपासणे आणि लहान मुलांचे वर्कआऊट सेशन करणे शक्य होणार आहे.
  • तज्ज्ञांच्या मते, संशोधन आणि सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा अधिक धोका आहे. स्मार्टवॉच हे पालकांसाठी लहान मुलांची काळजी घेण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे
  • स्मार्टवॉचच्या मदतीने पालक मुलांच्या आरोग्यावर देखरेख ठेवू शकणार आहेत.
  • तसेच जीओक्यूआयआयच्या कोचकडून सल्लाही घेऊ शकणार आहेत. कंपनीकडून लहान मुलांसाठी खास वर्कआउट सेशन घेण्यात येणार आहेत.
  • मुलांची तार्किक बुद्धिमत्ता विकसित होण्यासाठी खास गेम स्मार्ट वॉच अॅपवर उपलब्ध आहेत. त्यामुळे मुले अधिक आनंदाने खेळू शकणार आहेत.

हेही वाचा-महागाई-विकासदरातील संतुलनाकरिता आरबीआयकडून व्याजदर स्थिर - अर्थतज्ज्ञांचे मत

दरम्यान, स्मार्ट विटल ज्यूनिअर हे कंपनीच्या अॅपवर उपलब्ध आहे. तसेच अॅमेझॉन आणि फिल्पकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.