वॉशिंग्टन- अमेरिकेमधील एच-१बी व्हिसाधारकाच्या पत्नीला काम करण्याची मंजुरी मिळण्यासाठी गुगलकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. भारतामधील आयटी व्यावसायिकांकडून एच-१बी व्हिसा मिळविण्याचे सर्वाधिक प्रयत्न होतात.
अमेरिकेमधील एच-१बी व्हिसाधारकाच्या पत्नीला काम करण्याची मंजुरी मिळण्याची ३० कंपन्यांची मागणी आहे. या मागणीला गुगलनेही पाठिंबा दिला आहे. अमेरिकेच्या नागरिकत्व व स्थलांतरण सेवेकडून एच-१बी व्हिसाधारकांच्या पत्नी आणि २१ वर्षांहून कमी वयाच्या मुलांना एच-४ व्हिसा दिला जातो.
हेही वाचा-जीएसटी परिषदेची २९ मे रोजी होणार ऑनलाईन बैठक
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी ट्विटमध्ये म्हटले, आमच्या देशाच्या स्थलांतरितांना मदत करताना आम्हाला अभिमान वाटत आहे. आम्ही एच-४ प्रोग्राममध्ये ३० कंपन्यासह सहभागी झालो आहेत. त्यामुळे नवसंशोधन, रोजगारात आणि संधीत वाढ आणि कुटुंबांना मदत होईल.
गुगलशिवाय अॅडोब, अॅमेझॉन, अॅपल, ईबे, आयबीएम, इंटेल, मायक्रोसॉफ्ट, पेपल आणि ट्विटर या कंपन्यांनीही एच-१बी व्हिसाधारकांच्या पत्नीला काम करण्याची मंजुरी देण्यासाठी समर्थन दिले आहे.
हेही वाचा-चीपचा अपुरा पुरवठा असल्याने ह्युदांईसह किया उत्पादन प्रकल्प बंद ठेवणार
काय आहे एच १बी व्हिसा-
अमेरिकन कंपन्यांकडून स्थलांतरित नसलेल्या विदेशातील कर्मचाऱ्यांना एच१बी व्हिसा देण्यात येतो. विशेषत: तांत्रिक गोष्टीत तज्ज्ञ असलेल्या व्यक्तींना एच १बी व्हिसा देण्याचे प्रमाण अधिक आहे. अमेरिकेतील अनेक तंत्रज्ञान कंपन्या हजारो कर्मचाऱ्यांना नोकरीत घेण्यासाठी चीन आणि भारतातील मनुष्यबळावर अवलंबून असतात.
दरम्यान, भारतामधून दरवर्षी हजारो आयटी तंत्रज्ञ अमेरिकेत एच १बी व्हिसा मिळवून जातात.