ETV Bharat / business

सोन्याच्या आयातीत एप्रिल-जानेवारीत ९ टक्क्यांची घसरण

सोने आयात घटल्याने चालू वित्तीय खात्यात तूट कमी होण्यासाठी मदत झाली आहे. मागील वर्षाच्या जूलैपासून सोने आयातीत घसरण झाली आहे. तर गतवर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये सोने आयातीचे प्रमाण वाढले आहे.

Gold Import
सोने आयात
author img

By

Published : Feb 17, 2020, 2:59 PM IST

नवी दिल्ली - चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते जानेवारीदरम्यान सोने आयातीत ९ टक्क्यांची घसरण झाली आहे. ही आयात एकूण २४.६४ अब्ज डॉलरची झाली आहे. मागील आर्थिक वर्षीच्या एप्रिल-जानेवारीत २७ अब्ज डॉलरची सोने आयात झाली होती.

सोने आयात घटल्याने चालू वित्तीय खात्यात तूट कमी होण्यासाठी मदत झाली आहे. मागील वर्षाच्या जूलैपासून सोने आयातीत घसरण झाली आहे. तर गतवर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये सोने आयातीचे प्रमाण वाढले आहे. सोने आयातीत डिसेंबरमध्ये ४ टक्क्यांची तर जानेवारीत ३१.५ टक्क्यांची घसरण झाली आहे.

हेही वाचा-भारती एअरटेलने थकित एजीआर शुल्कापोटी सरकारकडे भरले १० हजार कोटी!

भारतामध्ये सर्वाधिक सोन्याची आयात करण्यात येते. देशातील दागिने उद्योगाकडून बहुतांश सोन्याची आयात करण्यात येते. सोन्याची आयात वाढल्याने चालू खात्यातील वित्तीय तूट आणि व्यापारी तूट वाढते. त्यामुळे केंद्र सरकारने सोन्यावरील आयात शुल्क १० टक्क्यांवरून १२.५ टक्के केले आहे. आयात शुल्क जादा असल्याने दागिने उद्योग हे शेजांरील देशांमध्ये स्थलांतरित होत असल्याचा दावा उद्योग तज्ज्ञांनी केला आहे. रत्ने आणि दागिने निर्यातदारांनी सोन्यावरील आयात शुल्क ४ टक्के करावे, अशी मागणी केली होती.

हेही वाचा-एलआयसीचा हिस्सा विकून 'एवढे' कोटी रुपये मिळण्याची सरकारला अपेक्षा

रत्ने आणि दागिने निर्यातीत एप्रिल ते जानेवारीदरम्यान १.४५ टक्क्यांची घसरण होवून २५.११ अब्ज डॉलरची निर्यात झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.