ETV Bharat / business

सोन्याच्या दरातील घसरणीनंतर चांदी प्रति किलो १,९५५ रुपयांनी स्वस्त

सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. चांदीच्या किमती १,९५५ रुपयांनी घसरून प्रति किलो ६७,६०५ रुपये दर आहे.

चांदी
चांदी
author img

By

Published : Feb 3, 2021, 3:51 PM IST

नवी दिल्ली - सोन्याच्या किमतीमधील घसरण आजही सुरू राहिली आहे. सोन्याची किंमत प्रति तोळा २३२ रुपयांनी घसरून ४७,३८७ रुपये आहे. जागतिक बाजारात सोन्याचे दर घसरल्याने ही सोन्याच्या दरावर परिणाम झाल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे.

मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा ४७.६१९ रुपये होता. सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. चांदीच्या किमती १,९५५ रुपयांनी घसरून प्रति किलो ६७,६०५ रुपये दर आहे.

हेही वाचा-कच्च्या तेलाचे दर वाढूनही पेट्रोल-डिझेलचे दर 'जैसे थे'

मागील सत्रात चांदीची किंमत प्रति किलो ६९,५६० रुपये होती. बळकट झालेल्या डॉलरने सोन्याच्या किमतीवर दबाव आहे. दुसरीकडे शेअर बाजारात तेजी आहे. अशा स्थितीत गुंतवणुकदारांनी सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी कमी पसंती दर्शविली आहे.

हेही वाचा-गुंतवणुकदारांना ९,१२२ कोटी परत करा, फ्रँकलिन टेम्पलेटनला 'सर्वोच्च' आदेश

असे राहिले मंगळवारी सोने-चांदीचे दर

सोन्याचे दर दिल्लीत मंगळवारी प्रति तोळा ४८० रुपयांनी घसरून ४७,७०२ रुपये राहिले होते. चांदीचा दर मंगळवारी प्रति किलो ३,०९७ रुपयांनी घसरून ७०,१२२ रुपये राहिला होता. अमेरिकन सरकारने प्रोत्साहनात्मक पॅकेज जाहीर केल्यानंतर सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपान पटेल यांनी सांगितले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.